Tuesday, March 24, 2020

गुडीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


हे इंग्रजी वर्ष आले तेंव्हा नवीन दशकाच्या आशा आणि  आकांक्षा पुढील तीन महिन्यात सगळ्या विरून गेल्या. पण तरीही हिंदू नववर्ष परत नवीन आशा नवीन आकांक्षा घेऊन आले आहे. सर्व इडा पीडा टळो, आपण सर्व अजून जोमाने घरून कामाला लागू. बघा. आपण दसऱ्या ला सीमोल्लंघन करतो तसे गुडी पाडव्या ला सीमा कक्षेत राहून नवीन गुढ्या उभारू . (दोन्ही वेळा घरात बासुंदीच  असुदे बरे का ) . हे एक युद्धच आहे पण शत्रू एक जिवाणू आहे .  असे जीवाणू आणि पर्यावरणातील बदलांमुळे येणारी संकटं येत राहणार हे आता मानून चालू आणि त्याप्रमाणे तयार राहू. 

No comments: