Friday, November 27, 2020

गोष्ट ‘एका पात्राच्या ऑनलाईन गोष्ट ‘ ची

 

मराठी  मनाला संगीत , कला, नृत्य, सिनेमा , दूरचित्रवाणी  आणि नाटक ह्यांनी कायमच भुरळ घातली आहे. जो नाटक वेडा नाही तो मराठी माणूस नाहीच. मग तो कुठेही असेल तरी.  लोकडाऊन सोशल डिस्टंसिंग जरी  असले तरी शो मस्ट गो ऑन .  संपूर्ण नाटक नाही तर काही एक पात्रांची नाट्यमालिका ऑनलाईन माध्यमातून सादर करण्याची माझी  एक  कल्पना  होती  ह्यात आम्ही गाजलेल्या एकपात्री किंवा  अनेक पात्री  नाटकातील एका किंवा दोन पात्रांचा एक पुष्पगुच्छ अमेरिका येथील कनेक्टिकट मराठी मंडळ च्या दिवाळी प्रोग्रॅम  मध्ये सादर केला. तो इथल्या प्रेक्षकांना इतका आवडला की एक संकल्पक , दिग्दर्शक , लेखक, अभिनेता  आणि संयोजक म्हणून येणारे अभिनंदनाचे मेसेजेस , फोन या, कंमेंट्स अजूनही थांबत नाही. पु लं नि अपूर्वाई च्या प्रस्तावनेत असे काहीतरी  लिहिले आहे: "माझा एक मित्र म्हणाला तू कुठेही फिरायला खुशाल जा , मजा कर, खा  पण प्रवासवर्णन लिहू नकोस." तसेच मलाही माझ्या एका कट्ट्यावरच्या मित्राने सांगितले "बाबारे नाटक कर पण त्यावर  ब्लॉग लिहू नकोस”. पण त्याचे  काय आहे मला गोष्ट ऐकण्याची आणि सांगण्याची सवय आहे. म्हणून हा विक्रमादित्य आपला हट्ट सोडणार नाही.  ही गोष्ट आहे ह्या एका पात्राची  ऑनलाईन  गोष्ट ह्या नाटकाची . 

Diwali Greetings



 Lights, Camera, and Action: This Festival Light has this new meaning in 2020 when everything is Online. So let this be a

clapshot of new beginning, meaning, and paradigms of our lives.

Happy Diwali to you and your family.