फेब्रुवारी
मार्च एप्रिल हा लहानपणी परीक्षेचा काळ
असायचा. असायचा का सध्या देखील
असतो सध्या च्या लहानांना .
घरात
कर्फ्यू . टी व्ही बंद , खेळायला जायचा लिमिटेड टाइम. आमच्या घराला एक गच्ची होती
. पूर्वी म्हणजे अगदी ८५ पर्यंत तिथून
पर्वती दिसायची .एका अँगल मधून तोरणा पण दिसायचा , अगदी
सीडी ला कात्रजच्या
घाटाचे डोंगर पण दिसायचे.
नंतर त्याबाजूला असलेला वाडा
पडून उंच इमारत झाली . मग ते दृश्य
आणी येणारं वारा
दोन्ही संपले . असो . त्या गच्चीवर टेबले लॅम्प आणि स्टूल घेऊन आम्ही (मी आणि माझी
बहीण) अभ्यास करायचो. पूर्ण वर्षभर युनिट टेस्ट आणी सहा
माही चा थोडा काळ
सोडला तर अभ्यास हा
फक्त होमवर्क करण्याकरिता . लक्ष फक्त क्रिकेट बघणे आणि खेळणे , गॅथेरिन्ग ची नाटके, टी
व्ही , गप्पा टप्पा . पोरशन संपवायची घाई . पाठ करणे, उत्तरे वाचणे, आकृती काढ्याची प्रॅक्टिस . आकृतीची भीती वाटायची. गणिते सोडवणे . एका वाक्यात उत्तर, कारणे द्या , संदर्भा सहित स्पष्टीकरण , जोड्या लावा, गाळलेल्या जागा भरा . अजूनही सगळे आठवून अंगाला काटा येतो. परीक्षे
चा शेवटचा दिवस कॅलेंडर वर मार्केड असायचा.
तो दिवस येतो आणि शेवटचा पेपर जेंव्हा परीक्षकांच्या हातात देतो
तो सुवर्णक्षण सगळ्यात महत्वाचा . मग नाचत घरी
येऊन दप्तर कधी फेकतो असे व्हायचे . काही मुलांच्या परीक्षा अगोदर संपायच्या . त्यांचा हेवा वाटायचा . ते पण जोरजोरात
खेळून आम्हाला खिजवायचे. मग आपली संपली
कि दुसऱ्यांना खिजवायचे. तेंव्हा मोबाईल इंटरनेट नव्हते म्हणून सुट्ट्या खूप एन्जॉय करायचो . सध्याची मुले काय करतात हे माहित नाही
कॅम्पस असतात, गेम्स , टी व्ही , टूर्स
असतात म्हणा . पण अजूनही फेब्रुवारी
ते एप्रिल हा काळ आठवतो
त्यावेळी डाएट हि वेगळे असायचे.
भाजी पोळी चा भरणा जास्त.
बाहेरचे खायचे नाही . होळी /रंगपंचमी खेळायची नाही. घरात आम्ही उत्सवमूर्ती . फार लाड .
मोठेपणी
परीक्षा रोज असते . त्यामुळे आता तयारी आणी अभ्यास रोज करायला लागतो . प्रत्येकाची परीक्षा वेगळी . मग ती ऑफिस
ची असो, पॅरेंटिंग ची असो, ट्रॅफिक
जामची असो , आरोग्याची
असो , संगीताची असो कसली ही असो
दशक
सुरु होऊन दोन महिने झाले . इराण च्या धमक्या , कोरोना ची दहशत ,
शत्रू पुरस्कृत दंगली, CAAचा अनावश्यक विरोध,
मंदी ह्या परीक्षा समोर उभ्या आहेत. पाहिजे तो अभ्यास, आत्मविश्वास,
शांत डोके आणि नियोजन. अगदी शाळेच्या वेळेसारखे. जशी वार्षिक परीक्षा एप्रिल पर्यंत संपते तश्या ह्या परीक्षा ही संपावी अशी
देवाकडे प्रार्थना . तो सुटण्या चा
दिवस कधी आहे हे मात्र माहित
नाही
No comments:
Post a Comment