Sunday, February 9, 2020

एक दिवस एक आचार:: शनिवार स्पेशल

पु ल शनिवारविषयी म्हणतात 

पु लं प्रमाणे बहुतेक सगळे मान्य करतील की  आपण शनिवारी काय करतो हा आपल्या सध्याच्या आयुष्यातील हायलाईट असतो.

अर्धा रविवार हा पुढच्या आठवड्याच्या तयारी मध्य जातो मग ते  स्वछता असो स्वयंपाकातील तयारी असो, अभ्यास असो अजून काही महत्वाची कामे असो. काहींना शनिवारी हाफ डे किंवा फुल डे असल्यामुळे त्यांना थँक्स गॉड फ्रायडे हे प्रकरण नसते.  खरा प्राईम टाइम हा शनिवारी दुपारी ३ ते रात्री ११ (काहींचे अजून उशिरा ) असतो

माझ्याबाबतीत म्हणाल तर, मला पूर्ण शनिवार आवडायचा लहानपणी

सकाळची शाळा असायची, थंडीत फार त्रास व्हायचा पण मजा असायची , आमच्या घरात अंडे एकमेव दिवशी अलाऊड असायचे . शाळेतल्या डब्या दिले जायचे. दुपारी १२ला शाळा सुटली कि आम्ही ग्राउंड वर क्रिकेट फ़ुटबाँल हॉकी व्हॉलीबॉल खेळायचो . मग दुपारी २ ला मुकुंद नगर वरून सहकार नगर मार्गे  सदाशिव पेठेत घरी पोहोचायचो. घरी माझी फेवरेट आमटी केली असायची आईने . मग थोडी झोप, मग वाड्यात खेळायचे , संध्याकाळी  मराठी/हिंदी चित्रपट TV वर पाहताना चमचमीत जेवायचे, जॉईंट फॅमिली असल्यामुळे मग गाद्या घालून पत्ते गप्पा . सिम्पल पण खूप मज्जा यायची . रविवारी सकाळी आठ ला उठून TV वर रामायण वगैरे बघत सगळे ब्रेड इडली पॅटीस चा ब्रेकफास्ट . मग दुपारच्या जेवणानंतर होमवर्क वगैरे...

हॉस्टेल मध्ये खूप अभ्यास असायचा पण शुक्रवार संध्याकाळ चा पिक्चर असायचा आणि शनिवारी संध्याकाळी मोठ्या गप्पांचा फड , नाईट आऊट आणि मग सूर्योदय बघून इन्स्टिटयूट च्या मेन गेट बाहेरील  रेल्वे ट्रॅक शेदारी चेदी नावाच्या टपरी वर अंड्यांचा ब्रेकफास्ट करून झोपायचे . खरगपूर गावात दुसरे काही नाईट लाईफ नव्हते. तेंव्हा आपण फार काही मिस करतोय असे वाटाचये

जेव्हा कामानिमित्त मुंबईत राहायचो तेंव्हा आम्ही मुंबईच्या डाउनटाउन मध्ये स्टर्लिंग ला सिनेमा मग त्यासमोरील पब मध्ये नाईटलाईफ एन्जॉय एन्जॉय कराचे  किंवा घरी पुण्यात आलो की  मित्राबरोबर डेक्कन वर किंवा मग रोड वर खाणे आणि कॉफी.

शाळा कॉलेज आणि थोडे नंतर महिन्यातून एका शनिवारी ट्रेक असायचाच मग तो साधा सिंहगड का असेना . गडावरची शनिवार रात्र अफलातून असायची. पावसाळी ट्रेक असेल तर तो घोंगावणारा वर, पाऊस थंडी. हिवाळी ट्रेक मध्ये आकाशदर्शन चांदणे थंडी  शेकोटी धमाल


लग्न झ्यालावर किंवा यंग संसारात शनिवार हा ईट आऊट चा असायचा, पुण्यातले कुठेही हॉटेल सुटले नसेल. मग मुलगी थोडी मोठी झाल्यावर राऊंड टेबल च्या क्लब मध्य मित्रांच्या फॅमिलीस बरोबर घरात/बाहेर पार्टीस . बहुतेक वेळा महाबळेश्वर/लोणावळा/गोवा मध्ये फॅमिली औटींग.

ह्या सर्व प्रकारात लहानपणी घरी किंवा हॉस्टेल मध्ये जो शनिवार असायचा तो सगळ्यात छान वाटायचं. मुद्दा असा कि प्रचलित हॅपनिंग असणाय्रा नाईटलाईफ म्हणजे हॉटेल पब पार्टीस   पेक्षा घरी किंवा मित्राबरोबर सेमी रूरल शहरातील हॉस्टेल च्या रूम मध्ये खूप जास्त मजा यायची.अपवाद मात्र फॅमिली वीकएंड औटींग . आणि सध्या तेच चालू आहे .

शनिवार हा स्पेशल असावाच लागतो ज्यांना ही गम्मत कळली नाही त्यांना आयुष्य कळलेच नाही



No comments: