कुठलीही हिंदी एकता कपूर किंवा अन्य सिरीयल बघा . कुठलीही मराठी सिरीयल बघा. एक सुशील संस्कारी गरीब स्वभावाची चांगली सून असते , आणि एक दुष्ट स्वभावाची तिचा जाच करणारी सासू असते . प्लॉट थोडे वेगळे वेगळे असतात. जी संस्कारी सून असते तिची एक चार पाच लोकांशी लग्ने झाली असतात हे वेगळे पण त्यात तिच्या स्वभावाचा दोष नसतो ती तर हालात से मजबूर असते. असो विषयांतर झाले. . विषय तिच्या सासूचा सॉरी सासऱ्यांचा आहे. सासू फार पाताळयंत्री असते. पदोपदी सुनेला जाच त्रास छळ कारस्थान सगळे काही करत असते. खोटेपणा करत असते. दर्शकांना एस्पेसिअल्ली भावुकपणे बघणार्यांचा पारा वाढत असतो . सासूला शिव्या बसत असतात . एक व्यक्ती मात्र शांतपणे पेपर वाचत बसले असतात . ते म्हणजे त्या सासूचे यजमान म्हणजे सुनेचे सासरे. जब सास भी कभी बहू थी म्हणजे सासूच्या तरुणपणात जेंव्हा सासू चे नवीन लग्न झाले असते आणि ती सून असते तेंव्हा जर का ह्या सासर्यांनी पेपर ना वाचता किंवा चहा टाकायचे फर्मान न सोडता जर थोडा चांगुलपणाचा वचक दाखवला असता तर सासू पुढे जाऊन असं वागलीच नसती . तुम्ही विचारलं मी त्या सिरिअल्स बघतो का? बघायला लागते अहो घरात राहायचे असेल तर हे कानावरून तरी जातच असते . सासरे मंडळींना ह्यात काहीच say नसतो. ऑडियन्स चा गुडविल मिळतो पण कथानकात काही इम्पॅक्ट नसतो. वेळीच पेपर न वाचता लक्ष दिले असते तर.
आपण पण एक पेपर वाचणारे सासरे आहोत. देशात आजूबाजूला जे काही नको वाटणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना वेळीच विरोध केला असता तर किंवा अजूनही केला तर वाईट काही होणारच नाही .
आपण पण एक पेपर वाचणारे सासरे आहोत. देशात आजूबाजूला जे काही नको वाटणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना वेळीच विरोध केला असता तर किंवा अजूनही केला तर वाईट काही होणारच नाही .
No comments:
Post a Comment