Monday, January 20, 2020

एक दिवस एक आचार: घन घन माला ला न्याय द्या


घन घन माला  ला न्याय द्या 


घन घन माला नाभि दाटल्या कोसळती धारा
मन्ना डे ह्यांच्या स्वर्गीय आवाजात राग मिया मल्हार मधील सुंदर गाणे. आमच्या कडे पाऊस आला कि हे नक्की गुणगुणले जाते . काल एका गायन वादन मैफलीत हे गाणे म्हणले गेले. खरे तर २० एक लोकांनी  एकत्र येऊन भरपूर मराठी गाणी म्हणली . खूप मजा आली . थोडे  विषयांतर झाले .
इतके सुंदर गाणे वसंत पवार ह्यांचे संगीत. गदिमा ह्यांचे बोल . इतके सर्वांगसुंदर गाणे पण तुम्ही कधी त्याचे चित्रण पहिले का आजच्या भाषेत म्हणायचे तर  म्युसिक  विडिओ . इतके टुकार आहे. भरपूर लोक आहेत, एक वयस्कर गवई गात आहेत. त्यांचे शिष्य आहेत . रमेश देव आहेत पण हिरो कोण असेल तर नळ आणि त्याला न येणारे पाणी आणि  एक गलिछ मोरी. कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करत असावेत बहुतेक. वरदक्षिणा हा चित्रपट  नावावरून सामाजिक वाटतोय . पण एक मात्र आहे कि मराठी चित्रपट सत्य स्थितीशी निष्ठ असतो. उगाचच आलिशान बंगले नाहीत , हिरो कडे मोठ्या गाड्या नाहीत, फॉरेन लोकेशन नाहीत. हे चांगले का वाईट हे माहित नाही पण ह्या गाण्यावर अन्याय झालाय हे नक्की असे मला वाटते. तुम्हाला?



No comments: