Wednesday, January 29, 2020

एक दिवस एक आचार::सुपर सुपर सुपर


सुपर सुपर सुपर 
थँक यू   सुपर रोहित,  सुपर शमी आणि सुपर विलियम्सन
पहिल्यांदा रोहित ने वेगळ्याच पीच वर बॅटिंग केली. 
नंतर न्यूझीलंड ला विलियम्सन ने ना भूतो ना भविष्यती अशी बॅटिंग करून न्यूझीलंड ला अगदी विजयाच्या दोन रन जवळ आणून
नंतर हरलेली मॅच आपण जिंकलो शमीच्या तीन बॉल्स मध्ये
शेवटी इतके अप्रतिम खेळून पुन्हा एकदा विलियम्सन सुपर ओव्हर मध्ये हरला. त्याने व न्यू झीलंड ने  आता सुपर शांती करून घ्यावी

Monday, January 27, 2020

एक दिवस एक आचार:आपण सारे पेपर वाचणारे सासरे आहोत

कुठलीही हिंदी एकता कपूर किंवा अन्य सिरीयल बघा . कुठलीही मराठी सिरीयल बघा. एक सुशील संस्कारी गरीब स्वभावाची चांगली सून असते , आणि एक दुष्ट स्वभावाची तिचा जाच करणारी सासू  असते . प्लॉट थोडे वेगळे वेगळे असतात. जी संस्कारी सून असते तिची एक चार पाच लोकांशी लग्ने झाली असतात हे वेगळे  पण त्यात तिच्या स्वभावाचा दोष नसतो ती तर हालात से मजबूर असते. असो विषयांतर झाले. . विषय तिच्या सासूचा सॉरी सासऱ्यांचा आहे. सासू फार पाताळयंत्री असते. पदोपदी सुनेला जाच त्रास छळ कारस्थान सगळे काही करत असते. खोटेपणा करत असते. दर्शकांना एस्पेसिअल्ली भावुकपणे बघणार्यांचा पारा वाढत असतो . सासूला शिव्या बसत असतात . एक व्यक्ती मात्र  शांतपणे   पेपर वाचत बसले असतात . ते म्हणजे त्या सासूचे यजमान म्हणजे सुनेचे सासरे. जब सास भी कभी बहू थी  म्हणजे सासूच्या तरुणपणात जेंव्हा सासू चे नवीन लग्न झाले असते आणि ती सून असते तेंव्हा जर का ह्या सासर्यांनी पेपर ना वाचता किंवा चहा टाकायचे फर्मान न सोडता जर थोडा चांगुलपणाचा वचक दाखवला असता तर सासू पुढे जाऊन असं वागलीच नसती . तुम्ही विचारलं मी त्या सिरिअल्स बघतो का? बघायला लागते अहो घरात राहायचे असेल तर हे  कानावरून तरी जातच असते .  सासरे मंडळींना  ह्यात काहीच say नसतो. ऑडियन्स चा गुडविल मिळतो पण कथानकात काही इम्पॅक्ट नसतो.  वेळीच पेपर न वाचता लक्ष दिले असते तर.
आपण पण एक पेपर वाचणारे सासरे आहोत. देशात आजूबाजूला जे काही नको वाटणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना वेळीच विरोध केला असता तर किंवा अजूनही केला तर वाईट काही होणारच नाही . 

Thursday, January 23, 2020

एक दिवस एक आचार: हॉस्टेल मधले नाईटलाईफ


हॉस्टेल मधले नाईटलाईफ 
मध्ये नाईटलाईफ होणार हि घोषणा ऐकून मला माझ्या हॉस्टेल मधले नाईटलाईफ आठवले
हॉस्टेल मधल्या  राहणाऱ्यांना नाईटलाईफ चे काय कौतुक ? तेथे रात्री २ च्या आधी झोपणाऱ्या मुलांना रेड कार्ड दिले जायचे . काही लोके त्याच्या पेक्षा उशीरा झोपायचे. ४ वाजता फार कमी का होईना पण प्रहावाच्या विरुद्ध जाणारी मंडळी पण होती.   हॉस्टेल ला  कायम जाग असायची.
 कोणी अभ्यास करायचे कोणी टाईमपास . कोणी म्युसिक ऐकायचे/वाजवायचे . आमच्यासारखे कोणी नाटकाची प्रॅक्टिस करायचे . कोणी t v रूम मध्ये असायचे . कोणी टेबल  टेनिस खेळायचे . कोणी चेस . मेस चे इतके घाणेरडे जेवण जेऊन मध्यरात्री भूक नाही लागली तर शप्पथ . नोरेनदा चे कॅन्टीन हे आमचे तारणहार होते . आम्लेट, बुर्जीपाव, मॅग्गी अंडा बर्गर चौमेन चहा कॉफी शिकंजी असा मस्त मेनू असायचा . तेथे गप्पांचे फड रंगायचे . विषय अगदी गोविंदा ची नवी फिल्म , क्रिकेट, अभ्यास, करिअर, मुलींचे हॉस्टेल, आंतर हॉस्टेल स्पर्धा (चिंचोरे बघितला असेलच ), फॉरेन पोलिसी, राजकारण, काहीही .
असो गेले ते दिन  गेल्या त्या आठवणी

Hostel Nightlife
There is a lot of discussion about 'Nightlife in Mumbai'decision by the new non- elected government of Maharashtra. For a hostel veteran like me, it reminded me of  Nightlife there and felt this is a non-issue. 
People who slept before 2 am were red-carded. Few used to sleep later than that while few didn't sleep at all for a few days especially during exams. There were few exceptions who used to sleep early and woke up at 4 am ensuing 24/7 continuity of chaos at the Hostel. Just like City, the hostel never sleeps.
Some used to study some used to waste time chatting in the rooms. Some listened to while some played music. Few drama enthusiasts like me used to practice drama. Some watched TV in the common room. Some played TT. Some played Chess,. Norenda's canteen was a savior for residents as somehow mess people used to serve the messiest food possible. Menu of Egg omelet, scrambled eggs, Maggie,  chowmein, egg sandwiches/burgers, tea, coffee, lemon juice was magical. I still remember the taste. Chat topics continued late into night ranging from new movie release, cricket, studies, career, politics, foreign policies, inter hostel rivalry (refer movies Chichore), girls hostel, professors, whatever under this sun.
Remember a song: Koi lautade mere beete hue din.....

Wednesday, January 22, 2020

एक दिवस एक आचार:झेंडा आणि अजेन्डा

झेंडा आणि अजेन्डा 

मीडिया ला सिरिअसली घेऊ नका
बॉलीवूड ला सिरियसली घेऊ नका
सोशल मीडिया ला सिरिअसली घेऊ नका
पॉलिटिशिअन्स ला सिरिअसली घेऊ नका
पुरोगाम्यांना सिरिअसली घेऊ नका
कॉर्पोरेट व्हिलन आहॆ
साहित्यिक सामान्य दर्जाचे आहेत
पब्लिक एकतर भक्त आहेत किंवा अँटी नॅशनल आहेत
न्यायालये एक तर कमी आहेत किंवा निस्पृह  नाहीत
उरते कोण फक्त्त सैन्य. त्यांच्यावर अजूनतरी विश्वास आहे (तो पानिपतावर नाही )
विठ्ठल कोणता झेंडा घेऊ हाती 

Monday, January 20, 2020

एक दिवस एक आचार: घन घन माला ला न्याय द्या


घन घन माला  ला न्याय द्या 


घन घन माला नाभि दाटल्या कोसळती धारा
मन्ना डे ह्यांच्या स्वर्गीय आवाजात राग मिया मल्हार मधील सुंदर गाणे. आमच्या कडे पाऊस आला कि हे नक्की गुणगुणले जाते . काल एका गायन वादन मैफलीत हे गाणे म्हणले गेले. खरे तर २० एक लोकांनी  एकत्र येऊन भरपूर मराठी गाणी म्हणली . खूप मजा आली . थोडे  विषयांतर झाले .
इतके सुंदर गाणे वसंत पवार ह्यांचे संगीत. गदिमा ह्यांचे बोल . इतके सर्वांगसुंदर गाणे पण तुम्ही कधी त्याचे चित्रण पहिले का आजच्या भाषेत म्हणायचे तर  म्युसिक  विडिओ . इतके टुकार आहे. भरपूर लोक आहेत, एक वयस्कर गवई गात आहेत. त्यांचे शिष्य आहेत . रमेश देव आहेत पण हिरो कोण असेल तर नळ आणि त्याला न येणारे पाणी आणि  एक गलिछ मोरी. कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करत असावेत बहुतेक. वरदक्षिणा हा चित्रपट  नावावरून सामाजिक वाटतोय . पण एक मात्र आहे कि मराठी चित्रपट सत्य स्थितीशी निष्ठ असतो. उगाचच आलिशान बंगले नाहीत , हिरो कडे मोठ्या गाड्या नाहीत, फॉरेन लोकेशन नाहीत. हे चांगले का वाईट हे माहित नाही पण ह्या गाण्यावर अन्याय झालाय हे नक्की असे मला वाटते. तुम्हाला?



Saturday, January 18, 2020

एक दिवस एक आचार': बर्फातली गाणी



बर्फातली गाणी 
बर्फ पडतो आहे. पुण्यात पाऊस पडल्यावर कांदा भजी खायचो . थोडी थंडी पडली (पुण्यात किती ही थंडी पडली तरी ती गुलाबी असते)की  स्वेटर घालून पांघरुणात लोळत पडायचो. इथे -८ डिग्री तापमान आहे . बर्फ पडतो आहे. गाणी ऐकतो आहे
माझी काही आवडती बर्फातली गाणी
१ साथिया
२ ये हसीन  वादिया
३ तेरे चेहरे से नजर नही
४ या हू
५ तेरा मुझसे है पहले का नाता
६  जरा सा झूम लू मै
७ तू मेरे सामने
८ ये इष्क हाये
९ सुभानल्लाह
१० करवटे बदलते रहे
११. हम और तुम
१२ ये कहा आ गाये हम
तुमच्या मनात अजून काही गाणी आहेत का? ही  सगळी रोमँटिक गाणी आहेत . ह्याचे कारण भारतात बर्फ क्वचित पडतो तो सुद्धा उत्तरेकडील पर्वताच्या आसपास. त्यामुळे बर्फाळ एक रोमॅंटिक मिस्टरी आहे. इथे तो जरा सुंदर दिसत असला तर त्यामागे रोजच्याला कोण विचारे हा प्रश्न  ? दिसतात ते ड्राइव्हवाय क्लिअर करायचे दिसणारे कष्ट . गाडीवरील बर्फ़ काढायचे. अवघड ड्रायविंग  आणि हुडहुडणारी आणि अंग आक्रंदणारी थंडी. जे आपल्या कडे नसते ते जास्त सुंदर दिसते तशे. मुंबईत पाऊस जसा रोमँटिक वाटत नाही तसं
असो गाणी एन्जॉय करू आणखी गाणी सुचवा

Songs in Snow
It's snowing here. Listening to favorite songs filmed in snow. Most of those are romantic. Snow is not so romantic here as it reminds of plowing of snow, shoveling, clearing the driveway, and most problematic is biting cold. Just as rain is not so romantic in Mumbai.
anyways pls suggest more songs
1. Sathiya
2.Yeh Haseen Wadiya
3. tere chehre se nazar nahi hatti
4  Yahoo
5. Tera muzse hain pehle ka naata kahi
6  Jara sa zoom lu mai
7, tu mere saamne
8 ye ishq haye
9 subhannalah
10 Karvate badalte rahe
11. Hum aur tum
12. Ye kaha aa gaye hum


Friday, January 17, 2020

'एक दिवस एक आचार': दोन फुल एक हाफ


दोन फुल एक हाफ 
राहुल नाम तो सुना होगा . हा शाह रुख खान चा डायलॉग पण ऐकला असेल. हे दोन राहुल बघा 
दोघेही बंगलोर चे 
दोघेही  स्टयलिश फलंदाज 
दोघांच्या कडे ऑफ साईड चा गेम 
कॅप्टन म्हणेल तर एक ते आठ ह्या कुठल्याही क्रमावर दोघे खेळतात 
कॅप्टन म्हणेल तर विकेट कीपिंग पण करतात 
फरक एकच मैदानाबाहेर कशी  आदर्श  वागणूक असावी हे थोरल्याकडून शिकावे. 
धाकटा जरा सुधारेल हि अपेक्षा करू आणि सातत्यपूर्व कसे खेळायचे ते सुद्धा वर्षानुवर्षे ह्याचाच धडा त्याने घ्यावा. 
आज चांगला खेळळास  भावा 
आता विचारलं दोन फुल कळले एक हाफ चे काय?
सुज्ञास न सांगणे बरे 


Tale of Two and a half Rahuls
Both are from Bangalore
Both are stylish batsmen
Both have a great offside game
Both can bat at any position from one to eight as told by the captain
Both can keep wickets as  told by the captain
Only thing junior can learn from senior is ideal off the field behaviour
Also, wish he delivers consistently years after years like senior
Well played today mate...

Now you know about two Rahuls what about the half?
Silence is golden ...

Thursday, January 16, 2020

'एक दिवस एक आचार' : केकाटणारा आयडॉल



केकाटणारा आयडॉल 

एका बाजूला मराठीत सूर नवा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला एक केकाटण्या ची स्पर्धा चालू आहे ज्याला ते इंडियन आयडॉल असे म्हणतात. एका बाजूला अवधूत महेश पारख करतायत आणि दुसऱ्या बाजूला एक गाणे गाऊन सिलेब्रिटी झालेली बाई आणि पु ळांच्या भाषेत सांगायचे तर हा ठिगळया सर. हा हिंमेश सर ?? इथे सर्व संगीत प्रेमींना माझ्या सारख्या  निर्बुद्ध  माणसाला पडलेला प्रश्न विचारतो कि जो  बेंबीच्या देठातून कापऱ्या आवाजात जोरात केकाटतो तो चांगला गायक का भाव, सूर , शब्द सांभाळून एक सुरेल अनुभव देतो तो चांगला  गायक . कदाचित काहींना तौहीन वाटेल पण सीमे पलीकडून खूप मोठे नाव असलेले दिवंगत गायक सुद्धा मला कधी कधी संगीताच्या बाहेर वाटतात. तो एक वेगळा  आणि सुरेख अनुभव असतो हे मान्य. मागील पर्वात  सलमान नावाचा स्पर्धक जिंकून गेला . त्याच्या गाण्यात एका विव्हळणाऱ्या कुत्र्याच्या आवाजात ला दर्द आणि कल्हईवाल्याच्या केकाटण्याचा सुरेल मिलाफ होता . ह्यावेळी एक हलाखीतल्या परिस्थितीतून आलेल्या स्पर्धकाची आणि सलमानची जुगलबंदी म्हणजे एक भयानक अद्वितीय केकाटण्याची स्पर्धा होती. दुर्दैवाने मी त्यात अडकलो आणि बघतो तर काय ते सगळे जजेस त्या दोघांना डोक्यावर घेऊन नाचत होते. आपला बिचारा रोहित राऊत अडकला आहे त्या स्पर्धेत. देव त्याचे रक्षण करो . हे फक्त मलाच वाटते का आपण पण सहमत आहात .

Shouting Idol
Current Indian Idol should be renamed as shouting idol. I don't think they judge based on melody, singing quality and versatility. Last year we had Salman shouting at top of his voice and this time it is that sunny. Last week I was caught in their joint singing. I was destroyed. I also beg to accept that one song wonder lady and non-musician like HR as judges. I also without sounding sacrilegious I would say that I don't consider the across-border legend as a musician but a great performer though I would admit. But again I am not an expert. I am inviting all my expert friends to give me some insight.

Wednesday, January 15, 2020

'एक दिवस एक आचार' : तीळा तीळा दार उघड


संक्रांतीच्या मुहूर्तावर   'एक दिवस एक आचार' हे शीर्षक  घेऊन  मायबोलीतून काही विचार  प्रकट करायचा असा २०२०चा संकल्प घेतला  आहे . तो मला पूर्ण करता यावा हीच  ईश्वर चरणी प्रार्थना. 
आता तुम्ही विचाराल  आचार म्हणजे काय ? मी असे उत्तर  (  मे  महिन्यातील अखेरच्या दिवशी संगमेश्वर जिल्ह्यात म्हैस जशी ईशान्ये कडून उत्तरेला  होती  ती उत्तर  नाही. आणि ती  संक्रांत नव्हती  आज जशी आहे तशी ) देईन की  आचार म्हणजे काही निवडक  विचारांची फोडणी घातलेले लोणचे जे  दिवसाला जरा वेगळी चव आणायचा  प्रयत्न करेल . 

संक्रांतीच्या  हटके शुभेच्छा 
गोडव्या ने ओतप्रोत जगातला सगळ्यात जुना password असलेल्या तिळा ला टाकून आपल्या स्नेहात enter करण्याची friend request करतो. मकरसंक्रांती च्या शुभेच्छा