Sunday, September 15, 2019

अमेरिकेच्या मातीच्या कणातली वरात



अमेरिकेच्या मातीच्या कणा कणात शेक्सपिअर आहे आपले आजचे प्रमुख पाहुणे  जेंव्हा भारताच्या मातीच्या कणा कणात जातील तोच खरा सुदिन. पु हे ऐकून दचकतात. आपली ओळख करून देताना जर कोणी असे म्हणत असेल तर काय करावे त्यांनी ? इथे उभ्या महाराष्ट्रात  ते बघताना प्रेक्षाकांमध्ये हशा. तसाच हशा आपण त्याच अमेरिके च्या मातीत पिकवू शकू का? अमेरिकेचे सदाशिव पेठ ज्याला म्हणता येईल अश्या न्यू  इंग्लंड भागातील कनेक्टिकट राज्यात वाऱ्या वरची वरात बसवताना अनेक प्रश्न . बाकी काही म्हणा पु लंच्या साहित्यात सदाशिव पेठेला वेगळेच स्थान आहे म्हणून न्यू  इंग्लंड ला सदाशिव पेठ म्हणालो. इथले अमेरिकन लोक वेगळे आणि बाकीचे इतर असे समजतात हाही एक योगायोग
मराठी मंडळाच्या प्रतिनिधींनी व्हॉट्स ऍप्प च्या माध्यमातून दिलेल्या आव्हानाला  होय म्हणालो  खरे पण ते आपण पेलू शकु का ही शंका होती. अमेरिकेत मराठी मंडळे नेहमींच नाटके करतात. महाराष्ट्रातून अनेक रंगकर्मी इथे येऊन प्रयोग करतात. मग त्यात नवीन काय किंवा त्याबद्दल  तुम्हाला का सांगावे ? आणि असेही नाही कि आम्ही आमचे उभे आयुष्य रंगभूमीच्या उद्धाराकरिता व्यतीत गेले.  भारतातील नाटकात  थोडासा अनुभव, थोड्याशा आठवणी एवढ्याच तुटपुंजी वर आम्ही अमेरिकन नाट्यश्रुष्टीत काही क्रांती घडवून आणणार नव्हतो . मग आमच्या अमेरिकी स्टेज च्या पदार्पणाची गोष्ट का सांगावी?
कारण स्वतः पुलं नी सांगितले आहे असामीअसामी मध्ये. दिगंबर काका   म्हणतो: “ इथे ज्ञानेश्वर माऊलींनीच परमिट दिले आहे. कि राजहंसाचे चालणे असेल जगी  शहाणे म्हणून कावळ्याने चालूच नये काय?”
Dr लागू , काशिनाथ घाणेकर असतील मोठे रंगकर्मी म्हणून ह्या पुणेकर गौतमा ने  अनुभव सांगू नये  की काय?
तर करू  मी सुरवात?


सुरवात झाली  ती सदाशिव पेठेतल्या वाड्यातल्या गणपतीतएका  राजाच्या मागे भालदार  म्हणून  उभा होतो .  "जी  सरकार" ह्या  माझ्या दोन शब्दाच्या एकदा  येणाऱ्या डायलॉग ची मी कमीतकमी तीस वेळा  प्रॅक्टिस  केली. कदाचित हा गिनीज बुक मध्ये नसला तरी कदाचित सदाशिव गणपती मंडळ रेकॉर्ड बुक मध्ये तरी असेल हे  मी खात्रीपूर्वक आणि सदाशिव पेठी आत्मविश्वासाने सांगू शकतो. नंतर डायरेक्ट टीव्ही स्टार झालो. दचकलात ? त्याचे काय झाले आमच्या दोन वाड्यांनी मिळून एक ज्ञान दीप मंडळ चालू केले. आठवते ते का मुंबई दूरदर्शन चे आकाशानंद यांचा प्रोग्रॅम . तयार एकदा संतवाणी त गोरा  कुंभार झालो , आणि रामशास्त्री नाटकात राघोबादादा झालो. दोन्ही फोटो टीव्ही वर आले.  नंतर शाळेच्या गॅदरिंग मध्ये चार्ली चॅप्लिन च्या नाटकात चार्ली चॅप्लिन ची लाथ खाणारा पादचाऱ्यांचा  उत्तम मूक अभिनय  कदाचित पुष्पक मध्ये कमल हसन ने पण केला  नसेल . मग शाळेत प्रमोद काळे  सर भेटले  त्यांनी खऱ्या अर्थाने  मला नाटक करायला शिकवले. देवाने मला एक भेट दिली आहे ती म्हणजे दणदणीत आवाज. शाळेतल्या मुलींनी म्हणून मला एक फिशपॉन्ड दिला होता. ज्याला केकाटायला लागत नाही माईक तो असा बेशिस्त गौतम नाईक . खरेतर आवाज मोठा आहे हे सांगायला बेशिस्त हे विशेषण लावायची काही गरज नव्हती पण असामी मधल्या  डी बी जोशींना जसा निखळ प्रशंसा ऐकायचा योग नसतो तसा मला पण तो योग्य नाही . असो तर त्या आवाजामुळे सरांनी मला सूत्रधाराच्या भूमिकेमध्ये ब्रेक दिला. थोडे गाणे पण म्हणले त्या सूत्रधारानी. लोकांना ते आवडले. मग काय पुण्यात भारत नाट्य मध्ये  मग मुंबईला रवींद्र नाट्य मध्ये 'कावळे " ह्या नाटकांतून काम मिळाले. मिळाले म्हणजे सिलेक्ट झालो. नाटक करण्या पेक्षा प्रॅक्टिस मध्ये जास्त मजा येते ते अनुभवले. दिग्दर्शनाचे पदार्पण परत पुलं च्याच विठ्ठल तो आला आला हे नाटक सोसायटीच्या गणपती करता बसवले तेंव्हा.  त्यात मी विठोबा (रंगामुळे असेल कदाचित) आणि प्रोफेशनल नाट्यश्रुष्टीत रायगड मध्ये राजारामाची बाल  भूमिका केलेला राहुल अनपट भटजी  . हे नाटक  बसवताना दिग्दर्शकाच्या व्यथा कळल्या . पण लोकांकडून काम करून घेण्याचा धडा पण मिळाला. थोडी माध्यमाची ओळख आणि आवड तयार झाली.
जागर नावाची एक संस्था पुण्यात आंतरशालेय प्रसंग नाट्य स्पर्धा भरवते . त्या स्पर्धेत सलग दोन वषे वेगवेगळ्या विषयांवर नाटक केली . आमच्या टीम मध्ये सध्याचा नावाजलेला कलाकार सुनील अभ्यंकर उर्फ राया होता . अजूनही आम्ही भेटून धमाल करतो निळू फुले यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक शाळेला  मिळाले . सगळ्यात महत्वाचे सांगायचेच राहिले. त्या स्पर्धेत चर्चा असते, स्वतःच्या नाटकावर दुसऱ्या शाळेच्या टीम नि टीकाटिप्पणी करायची आणि आपण तिसऱ्या एका शाळेच्या नाटकांवर टीकाटिपणी करायची. मग आपल्या टीकेवर उत्तर द्यायचे. गप्पा मारण्यात काय कोण आमचा हात धरतो. योगायोग असा कि दुसरी शाळा होती हुजूरपागा आणि तिसरी अहिल्यादेवी. दोन्ही आगाऊ मुलींच्या शाळा (इथे मी टाळ्या किंवा शिव्यांचा मानकरी झालो ). मग काय भांडाभांडी. एका अति आगाऊ मुलीशी वाद घालताना मला माझ्या मित्रांना आवरावे लागले.
मग कॉलेज मध्ये गेल्यावर पुरषोत्तम करंडक मध्ये पदार्पण केले. तो अनुभव आपण वेगळ्या वेळी सांगतो. महत्वाचे एवढे कि पुरषोत्तम एक विद्यापीठ आहे. आणि माझ्या नशिबाने आनंद जालगी, सध्याचा  प्रख्यात  लेखक दिग्दर्शक गिरीश जोशी, संगीतकार नरेंद्र भिडे  ह्या सारख्या मित्रांबरोबर काम करायला मिळाले.
पुढील शिक्षणासाठी खरगपूर ला गेल्यावर  एवं इंद्रजित, होळी, मोरूशी मावशी (हिंदी), आणि इतर काही नाटके केली . कोलकाता , जमशेदपूर चांदीपूर इथे प्रयोग केले. तिथला अनुभव पण वेगळाच लिहावा लागेल.  Drama सेक्रेटरी म्हणून आयोजनाचा अनुभव मिळाला. खूप मजेशीर अनुभव होता. शेवटच्या वर्षी हिंदी drama सोसायटी चा गव्हर्नर पण झालो. IIT चा स्पिंगफेस्ट मध्ये स्पर्धा आयोजन आणि प्रत्यक्ष सहभाग घेतलाअमोल पालेकरनाना पाटेकरजगजीत सिंग ह्या सारख्या मात्तबर लोकां  बरोबर संवाद करायची संधी  मिळाली
एकंदरीतच  नाटकाची  प्रोसेसच फार रम्य आहे. प्रथम  स्क्रिप्ट निवड  , कास्टिंग , वाचन, पाठांतर , तालमी . ते झाले की   ड्रेससेस, मेकअप , साऊंड . सेट, प्रॉपर्टी , साऊंडलाईट्स , बॅकस्टेज, प्रॉम्पटिंग  ह्या सर्वांचे coordination करून फायनल प्रॉडक्ट. मग सगळ्यात महत्वाचा प्रेक्षकांचा रिस्पॉन्स, टाळ्या, शिट्ट्या . प्रायोगिक असल्यामुळे प्रोमोशन आणि पब्लिसिटी हे अंग राहून गेले. पण नंतर फेस्टिवल्स आणि स्पर्धात काम केल्यामुळे थोडेफार प्रेक्षक आकृष्ट करण्याचे प्रयत्न पण केले आहेत . आहे मनोहारी तरी.  शेवटी करिअर च्या पाठीमागे धावताना हे सगळे कधी मागे पडले कळले पण नाही
मध्ये सोसायटीच्या गणपतीत  वाऱ्या वरची वरात मधील वार्षिकोत्सव लहान मुलांकडून करून घेतले. त्या  अनुभवाचाआणि इथे मोठ्यांकडून  करताना चा फरक फारच  रोचक आहे . तो नंतर सांगतो.
आता थोडे वाऱ्यावरची वरात विषयी . बहुदा ७९ ते ८१ पैकी कुठल्या तरी दिवाळीत त्याचा दूरदर्शन वर प्रयोग झाला होता. जुन्या लोकांना (आमच्यासारख्या ) ते  आठवत असेल. त्याचा  बिल्डअप ( साप्ताहिकी ची टी आर पी पण खूप होती) कि  लहानांना पण  हे कुतूहल कि मोठे एवढे का उडया मारत आहेत. लहानपणी किती मूर्ख होतो म्हणजे आता फार शहाणा आहे असे असे नाही . पु लं  चे  नाटक बघायला तेंव्हा   मला मारून मुटकून बसवावे लागले ? अशक्य कर्मदरिद्रीपणा .  
फारसे  काही  आठवत नाही पण काही   बायकांनी केलेला भयानक  गोंगाट मात्र आठवतो .
नंतर पु भेटीनंतर  पु भक्ती लागल्यावर , वाऱ्यावरची वरात ह्या कॅसेट ची असंख्य पारायणे झाली. श्रीकांत मोघे , आशालता, सुनीला  प्रधान आणि बाकीच्यांच्या डायलॉग तोंडपाठ झाले मग ते गरुडछाप असो, वार्षिकोत्सव असो, कि दिल डोके देखो असो, साक्ष असो नंतर शेवटी पु लं चा रविवार सकाळ मधला  सुरेख अभिनय असो . आमच्या परिवारातील कुठल्याही दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला वाऱ्यावरची वरात ची विडिओ कॅसेट लावायची हा नियमच झाला
खूप वर्षांनी मग थोडक्यात मुलांना पु साहित्य समजावे म्हणून सोसायटी च्या गणपतीत त्यांच्या कडून वाऱ्या वरची वरात बसवून घेतले . मुलांनी सुंदर काम केले. त्यांना डायलॉग लिहून द्यायला लागले , पाठ करून घ्यावे लागले, हसण्याचा जागा समजावल्या, खुप तालमी करायला लागल्या. मुलांचे कौतुक म्हणून नाही पण खरेच लोकांना नाटक आवडले. ते खरे खरे हसले.
मग जेव्हा CTMM च्या लोकांनी सांगितले कि अर्ध्या तासाचे, सहा सात जणांचे नाटक बसवा. तेंव्हा लगेचच वार्षिकोत्सव आठवला. आणि बाप्पा ची कृपा बघा बरोबर बायकांनी आणि पुरुषांनी प्रतिसाद दिला . बहुदा बाप्पाना ते नाटक खूप आवडत असावे म्हणा. किंवा पु लं नीच त्यांना वाऱ्या वरची  वरात बघाच अमेरिकेत असे कॅनव्हाससिंग  (हा पु लं च्या हरितात्या मधला शब्द) केले असेल.
अमेरिकेत अंतरे मोठी. तरी बरे आमचे  कनेक्टिकट राज्य छोटे . सगळ्यात लांब अंतर एक दीड तासा वर. ह्या नाटकात आभारप्रदर्शन करणारे पात्र म्हणते . एक वेळ अध्यक्ष मिळणे  सोपे आहे पण समारंभाला जागा मिळणे अवघड. नावाप्रमाणे राज्याच्या मध्यावर असणाऱ्या Middletown गावात राहणाऱ्या श्री सौ आशय साठे यांच्या बेसमेंट मध्ये प्रॅक्टिस करायचे ठरले. त्यांनी त्वरित होकार दिला. नंतर आले कास्टिंग . कास्टिंग च्या अगोदर थोडेसे वार्षिकोत्सवा विषयी .
वाऱ्यावरची वरात सुरु झाले कि या एक गरुडछाप तपकिरीची जाहिरात करून पु लं ना त्यांच्या गावाला व्याख्यानाला आमंत्रण देते. मग पु त्यांना सभा समारंभ कशे आवडत नाही म्हणून मागील एका खापरगाव गावातील अनुभव सांगतात.
पहिल्यांदा . पाच बायका उभ्या राहतात ते सा सू  म्म अशे बोर्ड घेऊन. मग त्या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा निवेदक ते बोर्ड बदलायला लावतो सा  सु म्म  आणि शेवटी  सू सा  . स्वागत करू या सकल जणांचे हे भयंकर बेसूर अँड गोंगाटाने भरलेले स्वागतपाद्य. भयानक सरगम, सूर , तबला पडणे . पु देशपांडे अध्यक्ष लाभला म्हणून पु ना घाबरवणे हे ह्यातले ठळक मुद्दे.
मग पु लंना हार घालायचा उपचार होतो. वेगवेगळ्या संस्था एकाच हार आणतात. महिला मंडळ प्रतिनिधी लग्नाचाच हार घालण्याचा अविर्भाव करतात . हार पु लं च्या डोक्यातूनच जात नाही.  मामलेदारांनी मात्र  मोठा हार असतो  . इथे साहित्य संघाचे प्रतिनिधी अनुपस्थित असणं हा टोमणा पु ल हाणता.तच
निवेदक हा पूर्ण कॉन्फिडन्स असलेला शिस्तप्रिय स्काऊट मास्टर (खरी पदवी मला  माहित नाही हे मान्य ). अध्यक्षांचे नाव विसरणे, प्रत्येक भाषणाआधी आणि नंतर शिट्टी वाजवणे, ढोंगी महिला दाक्षिण्य दाखवणे, नको तिथे शिष्टाचार पाळणे, अलंकारिक भाषा वापरून गोंधळ घालणे . आपल्याकुडन झालेली चूक ह्याचा क्षणभरही मुलाहिजा बाळगणे ठामपणे 'असो ' असे म्हणणे हे सगळे गुण  ह्यांच्यात असतात  

मग शाळेतले मुख्याधापक बोरटाके गुरुजी पु लं चा  पहिला परिचय करून देतात. ह्यात पु लं बद्दल एक अक्षर म्हणले जात नाही.  बहुदा एक ठरलेले भाषण पूर्ण पाठ करून (शेवटी मुख्याध्यापकच ) म्हणतात ते. अवजड शब्द वापरणे. मधून मधून गोंगाट करणाऱ्या मुलांना भाषणातून ओरडणे, शिव्या घालणे . रामदास महाराज म्हणत्यात म्हणून  शेवटी तुका म्हणे लावणे, अध्यक्षांना वानर म्हणणे , पाचवी पंचवार्षिक योजना, भारतीय  संस्कृतीची परंपरा अश्या टिपिकल अनावश्यक गोष्टी बोलणे हे ह्यांचे गुण.
दुसरा परिचय गावातील मोठे प्रस्थ सौ बेचलवार करून देतात. प्रथम प्रचंड घाबरलेल्या असतात आणि हातात कागद आल्यावर छापील भाषण  वाचून दाखवतात.   ह्या भाषणात  पु ल खूप बारीक जागा घेतात. उदाहरण म्हणजे थोर स्त्रियांची नावे घेताना गोपिकाबाई चितोडची इथे ब्रेक मग राणी पद्मिनी घेणे  .  त्या भाषणातून त्या स्वतःचा  मोठेपणा पण सांगतात . आम्ही नेहमी ट्रॅव्हल चे दौरे करतो, अमेरिकेच्या फॉरेन मध्ये शेक्सपिअर चे थडगे असणे असे कॉन्फिडन्टली सांगतात शेवटी ते अध्यक्षांना  भारताच्या मातीत जाण्याची धमकीवजा 'सदीच्छा' व्यक्त करतात.
मग पुलंच्या भाषणाला केवळ तीन मिनिटे दिली जातात.  तेंव्हा मान्यवरांना अल्पोपाहाराला जायला सांगितले जाते. पु तुम्हाला वाक्यवाक्याला हसवतील म्हणून सर्वजण प्रत्येक वाक्याला उगीचच हसतात
मग उपाध्यक्ष तू पा पिंजणकर आभार मानतात. ते सुद्धा प्रचंड घाबरलेले. पु लं च्या दिशेने तांब्यातुन पाणी प्यायले  धावून जातात . सुरवात करताना जागतिक शांतता , सर्वांगीण विकासअसे निरर्थक बरळतात. आणि मग कागद मिळाल्यावर सुसाट भाषण करतात .
इतके हास्य , इतका सटायर , सार्वजनिक शिष्टाचाराची चेष्टा , औपचारिकतेवरून होणार विनोद. ग्रामीण मराठी संदर्भ . एकदम धमाल प्रवेश आहे.
आम्हाला इथे प्रत्येक भूमिकेसाठी परफेक्ट कलाकार मिळाला. जास्त डायलॉग नसून सुद्धा प्रत्येक पंच ला रिऍक्ट करायचे काम पु लं च्या भूमिकेत आशय साठे यांनी सुरेख केले. निवेदिकांचा कॉन्फिडन्स आणि 'असोह्यातील नो नॉन्सेन्स भावना महेंद्र जोग यांनी  परफेक्ट   दाखवल्या . रश्मी साठे यांनी सौ बेचलवार हुबेहूब वठवली . मी ही  माझी  बोरटाके गुरुजी ह्यांची आवडती  भूमिका एन्जॉय केली. तू पा पिंजणकर ह्यांची भूमिका केदार दफ्तरदार यांनी साजरी केलीस्वागतपद्यातील भगिनी प्राची सहस्रबुद्धे , आसावरी नारकर, राधिका परमानंद ह्यांनी पुरेपूर गोंगाट केला. भगिनी मंडळातील प्रतिनिधी वैदेही परांजपे ह्यांनी लाजून खूप हशा पिकवला.
अमेरिकेत अजून एक करायला लागले की  हार घालायला फक्त दोनच संस्था दाखवायला लागल्या. बजरंग तालीम मंडळ प्रतिनिधी म्हणून चि आदित्य साठे ह्या teen ager ला घेतले . तबल्यावर बेसूर ठेका अँड हार घालायला सिद्धार्थ पेंढारकर यांनी खूप मजा आणली. मामलेदार म्हणून मराठी मंडळाचे सेक्रेटरी संकेत ओक ह्यांना उभे केले (नाही बसवले)
सुरवातीला ह्या सगळ्या जुन्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बरॊबर कसे ट्यून व्हावे हा चालेंज ते सुद्धा एक दिग्दर्शक/समन्वयक म्हणून? पण ह्या मंडळींनी खूप उपयुक्त सूचना आणि सर्व सहकार्य दिले.समर हॉलीडेस असल्यामुळे सगळ्यांच्या वेकेशन्स इंडिया ट्रिप्स सांभाळून तालमीआणि एक रंगीत तालीम असा दोन महिनांच्या वीकेंड्स चा प्लॅन तयार झाला. अमेरिकेतले वैशिठ्य म्हणजे सर्वांनी ते टाइम टेबल आणि वेळा काटेकोरपणे पाळल्या . स्क्रिप्ट म्हणून प्रत्येकाला यु ट्यूब  वर असलेल्या त्या ७९-८० साल च्या दूरदर्शन च्या विडिओ ची मदत घेतली. पु आणि सुनीताबाई ह्यांनी सगळे साहित्य रसिकाधीन केल्यामुळं ती चिंता नव्हती .
सेट आणि मेकअप हा फारसा अवघड पेपर नव्हता. वैदेही परांजपे ह्यांनी स्वा  सु ता म्म  हे बोर्ड केले. आसावरी ह्यांनी हार, रश्मी साठे यांनी स्काऊट ड्रेस, शिट्टया आणि सर्व महत्वाचे म्हणे पु लं चा विग आणि गेटअप. ह्या सर्वांनी फार इम्पॅक्ट केला. बाकी सर्वांनी आपापापल्या ड्रेस या मेकअप ची तयारी केली. राधिका यांनी मुसिक म्हणजे वरात चे   टायटल सॉंग आणि पु ह्यांची सिग्नेचर ट्यून तयार केले.
आम्ही काही इंप्रॉमप्टू  पण बदल केले .. निवेदकाचे हार घालता भगिनी समाजाकडे जाणे, पिंजणकरने चुकीची चिट्ठी वाचणे, साहित्य संघ ह्याऐवजी मराठी मंडळ असे लोकलायझेशन हे पण लोकांना आवडले.
शेवटी जसे म्हणले कि नाटक बसवणे आणि करणे हि एक प्रोसेस आहे. आणि ती करताना प्रत्येक क्षणाला जी एन्जॉयमेंट असते ती सगळ्यात महत्वाची . आणि मग नाटक एवढे विनोदी असताना ते सुद्धा पुलांचे म्हणजे सुवर्ण कांचन योग्य. इतके हसलो कि आम्हाला काळजी वाटत होती की प्रयोगाचच्या वेळी आम्ही हसू का. शेवटी काय हो आम्ही हौशी कलाकार.
हौशी कलाकारांची हौसेने केलेला हा अमेरिकन मातीतला प्रयोग मराठी जनतेला फार आवडला. खूप प्रतिक्रिया मिळाल्या. शेवटी काय पु लंचे साहित्याचं असे आहे . अजरामर. खरेच जगातील कुठलीही मातीत मराठी मन असेल तर त्या मातीतील कणाकणात  पु असणारच. आणि स्वागत पद्यातच सांगायचे म्हणजे    सुदिन तोचि आम्ही घडवला . खऱ्या अर्थाने बाप्पाचा सण साजरा केला . पु लांचे नाटक करणे हाचि दिवाळी दसरा ... बघू दिवाळी ला ह्या अमेरिकेच्या मातीतते काय नाटक करायचे ते . खरे नव्हे , ते तर करतोचपण स्टेज वर काय? तुम्हीच सुचवा.