Sunday, September 15, 2019

अमेरिकेच्या मातीच्या कणातली वरात



अमेरिकेच्या मातीच्या कणा कणात शेक्सपिअर आहे आपले आजचे प्रमुख पाहुणे  जेंव्हा भारताच्या मातीच्या कणा कणात जातील तोच खरा सुदिन. पु हे ऐकून दचकतात. आपली ओळख करून देताना जर कोणी असे म्हणत असेल तर काय करावे त्यांनी ? इथे उभ्या महाराष्ट्रात  ते बघताना प्रेक्षाकांमध्ये हशा. तसाच हशा आपण त्याच अमेरिके च्या मातीत पिकवू शकू का? अमेरिकेचे सदाशिव पेठ ज्याला म्हणता येईल अश्या न्यू  इंग्लंड भागातील कनेक्टिकट राज्यात वाऱ्या वरची वरात बसवताना अनेक प्रश्न . बाकी काही म्हणा पु लंच्या साहित्यात सदाशिव पेठेला वेगळेच स्थान आहे म्हणून न्यू  इंग्लंड ला सदाशिव पेठ म्हणालो. इथले अमेरिकन लोक वेगळे आणि बाकीचे इतर असे समजतात हाही एक योगायोग
मराठी मंडळाच्या प्रतिनिधींनी व्हॉट्स ऍप्प च्या माध्यमातून दिलेल्या आव्हानाला  होय म्हणालो  खरे पण ते आपण पेलू शकु का ही शंका होती. अमेरिकेत मराठी मंडळे नेहमींच नाटके करतात. महाराष्ट्रातून अनेक रंगकर्मी इथे येऊन प्रयोग करतात. मग त्यात नवीन काय किंवा त्याबद्दल  तुम्हाला का सांगावे ? आणि असेही नाही कि आम्ही आमचे उभे आयुष्य रंगभूमीच्या उद्धाराकरिता व्यतीत गेले.  भारतातील नाटकात  थोडासा अनुभव, थोड्याशा आठवणी एवढ्याच तुटपुंजी वर आम्ही अमेरिकन नाट्यश्रुष्टीत काही क्रांती घडवून आणणार नव्हतो . मग आमच्या अमेरिकी स्टेज च्या पदार्पणाची गोष्ट का सांगावी?
कारण स्वतः पुलं नी सांगितले आहे असामीअसामी मध्ये. दिगंबर काका   म्हणतो: “ इथे ज्ञानेश्वर माऊलींनीच परमिट दिले आहे. कि राजहंसाचे चालणे असेल जगी  शहाणे म्हणून कावळ्याने चालूच नये काय?”
Dr लागू , काशिनाथ घाणेकर असतील मोठे रंगकर्मी म्हणून ह्या पुणेकर गौतमा ने  अनुभव सांगू नये  की काय?
तर करू  मी सुरवात?

Wednesday, September 4, 2019

Baba



बाबा ह्या विषयावर काय लिहू ?
मुळतः वडीलां वर काही लिहिणे ह्या आगाऊपणावर जरी पुलंनी व्यंग केले तरी त्याला   जुमानत  आज ते धाडस  करतो .
पुलं च्या असामी मध्ये मास्टर शंकरचा  चा भाऊ गिर्या लिहितो आणि जे मुख्याध्यापिका सरोज खरे (आपली ) वाचतात : "आमच्या वडिलांनाआम्ही बाबा म्हणतात . माझे बाबा धोतरातून वांगी आणतातआमचे वडील  सूट घातल्या  वर डिट्टो  अशोक कुमार दिसतात "
अशोक कुमार  सारखे जरी ते  दिसत  नसले  तरी  तरी त्यांचे नाव असलेल्या बाबांच्यात आणि त्यांच्यात एक साम्य आहे दादामुनींचे ज्येष्ठत्व चित्रपट   क्षेत्रात  जसे मानले जाते तसेच बाबांचे   ज्येष्ठत्व सर्वत्र मानले जातेमग ते घरात असो, जवळील किंवा दोन्ही बाजूच्या लांबच्या नातेवाइकांच्यात असो , किंवा त्यांचा मित्रमंडीळीत किंवा कॉलेज मध्ये असो, किंवा वाड्यात, नवीन सोसायटीत असो किंवा माझ्या मित्रांच्या पालक ग्रुप मध्ये असो किंवा त्यांचा बागेत, आईच्या मित्रमंडळीत असो . ,  हे ज्येष्ठत्व केवळ वयामुळे नसून ते त्यांचा एकंदरीत व्यक्तिमत्वामुळे आले आहे कारण त्यांचा पेक्षा ज्येष्ठ लोकांच्या मनात त्यांच्या विषयीच्या भावना मी माझ्या लहान पाणी बघितल्या आहेत. त्यांचे ज्येष्ठ  व समवयस्क त्यांना अशोक हे संबोधन वापरताना येणारा  जिव्हाळायुक्त आदर मी जाणवला आहे.  अहो, बाबा, अशोकराव, काका, सर, आबा, कक्का हे संबोधन करणारी मंडळी तर त्यांचे फॅन क्लब आहेत. ह्या सर्वांचे सुद्धा ते मित्र बनू शकतात आणि फिलॉसॉफर, गाईड सुद्धा.

Sunday, September 1, 2019

Ganapati Bappa Morya

पुढच्या वर्षी लवकर या '  असे म्हणल्यानंतर ज्या दिवसाची गेले वर्षभर आपण वाट बघत होतो तो  दिवस उजाडला.  पुढचे काही दिवस आता आनंद आणि  उत्साह व त्या आठवणींच्या शिदोरी वर पुढील वर्षाकडे जोमाने बघण्याचा प्रपंच. बघितले तर  तोच तोच पणा आणि बघितले तर नव्या आठवणी जमा करण्याच्या छंद.    माझ्याप्रमाणे  तसाच छंद असणाऱ्या तुम्हा सर्वांना गणपतीच्या  हार्दिक शुभेच्छा