Wednesday, September 4, 2019

Baba



बाबा ह्या विषयावर काय लिहू ?
मुळतः वडीलां वर काही लिहिणे ह्या आगाऊपणावर जरी पुलंनी व्यंग केले तरी त्याला   जुमानत  आज ते धाडस  करतो .
पुलं च्या असामी मध्ये मास्टर शंकरचा  चा भाऊ गिर्या लिहितो आणि जे मुख्याध्यापिका सरोज खरे (आपली ) वाचतात : "आमच्या वडिलांनाआम्ही बाबा म्हणतात . माझे बाबा धोतरातून वांगी आणतातआमचे वडील  सूट घातल्या  वर डिट्टो  अशोक कुमार दिसतात "
अशोक कुमार  सारखे जरी ते  दिसत  नसले  तरी  तरी त्यांचे नाव असलेल्या बाबांच्यात आणि त्यांच्यात एक साम्य आहे दादामुनींचे ज्येष्ठत्व चित्रपट   क्षेत्रात  जसे मानले जाते तसेच बाबांचे   ज्येष्ठत्व सर्वत्र मानले जातेमग ते घरात असो, जवळील किंवा दोन्ही बाजूच्या लांबच्या नातेवाइकांच्यात असो , किंवा त्यांचा मित्रमंडीळीत किंवा कॉलेज मध्ये असो, किंवा वाड्यात, नवीन सोसायटीत असो किंवा माझ्या मित्रांच्या पालक ग्रुप मध्ये असो किंवा त्यांचा बागेत, आईच्या मित्रमंडळीत असो . ,  हे ज्येष्ठत्व केवळ वयामुळे नसून ते त्यांचा एकंदरीत व्यक्तिमत्वामुळे आले आहे कारण त्यांचा पेक्षा ज्येष्ठ लोकांच्या मनात त्यांच्या विषयीच्या भावना मी माझ्या लहान पाणी बघितल्या आहेत. त्यांचे ज्येष्ठ  व समवयस्क त्यांना अशोक हे संबोधन वापरताना येणारा  जिव्हाळायुक्त आदर मी जाणवला आहे.  अहो, बाबा, अशोकराव, काका, सर, आबा, कक्का हे संबोधन करणारी मंडळी तर त्यांचे फॅन क्लब आहेत. ह्या सर्वांचे सुद्धा ते मित्र बनू शकतात आणि फिलॉसॉफर, गाईड सुद्धा.


त्याचे कारण म्हणजे डोक्यावरचा बर्फ (फार कमी वेळा त्यांना मी चिडलेले बघितले आहे )आणि दुसऱ्याला ' ऐकण्या' चा दुर्मिळ गुण. त्यांच्ये अजून गुणवैशिष्ठय म्हणजे जीवाचे मैत्र बनवण्याचा अट्टाहास, मृदू वक्तृत्व आणि भिडस्तपणा.  हे कधी कधी त्यांच्ये वीकनेस पॉईंट्स पण ठरलेत पण विक्रमादित्याप्रमाणे ते कधी आपला अट्टाहास सोडत नाहीत . सर्व गोष्टीत त्यांना नेमकेपणा अँड व्यवस्थितपणा लागतो. जेव्हा आमच्या घरात पहिल्यांदा cassette रेकॉर्डर आणि प्लेअर आणला तेंव्हा सर्व कॅस्सेट्स ची  इंडेक्स वही त्यांनी तयार केली. त्या cassete मधली कोणती गाणी, कुठल्या सेकंदाला आहेत, गायक, संगीतकार , गीतकार, वगैरे माहिती  हे सगळे त्याच्यात लिहून ठेवले . 'स्वच्छता अभियान' म्हणे सरकारपात्री सुरु होण्यापूर्वी  तीस चाळीस वर्ष आधी त्यांनी घरात, कॉलेज मध्ये लाँच केली . हाडाचा शिक्षक असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकायला फासरे वेगळे काही करावे लागले नाही.  इतर विध्यार्थी व आमच्या पिढीतील जवळच्या लोकांना त्याचा फार फायदा झाला. 
त्यांचा कर्तृत्वाबद्दल मी काय लिहू, एका महाअवघड परिस्थितीतून कसे सावरायचे हे त्यांच्या मुळे शिकलो. आठवणी किती सांगू. जुन्या  वाड्यातील छोट्या घरातील टेबलाच्या  साइड कॅबिनेटच्या दाराचा स्टंप करून मी त्यांची अंडरआर्म बॉलिंग फेस करायचो. सायकल वरून  डबल सीट शिवाजीनगर कोर्टाजवळच्या रेल्वे लाईन वर सिंहगड एक्सप्रेस बघायला ते मला न्ह्यायचे. क्रिकेट वन डे बघण्यासाठी बुट्टी घ्यायची परमिशन ते द्यायचे. कधी अभ्यास करा असे म्हणाल्याचे मला आठवायचे नाही. Trivia , General Knowledge ,करंट इव्हेंट्स , ह्याबद्दल कायम आम्हाला अपडेटेड ठेवायचे. क्रिकेटप्रेम, पुल प्रेम, नाटक प्रेम , मुसिक प्रेम हे सगळे त्यांच्याकडून वारसाहक्काने घेतले. भावनिक जरी नसेल तरी तरी आजोबा, आजी गेल्यावरच्या  डोळ्या च्या कडा पुसताना मी त्यांना पहिले आहे. खरगपूरला सोडताना सायकल रिक्षा मधून  स्टेशनला जाताना त्यांचा चेहरा मी आज हि विसरलो नाही. आता तिसरी पिढी त्यांचा मेकअप करतात . पावडर फसतात आणि ते सहन करतात. त्यांच्या नाती त्यांना skype आणि whatsapp शिकवतात. पण त्यांच्या कडे कॉम्पुटर आणि स्मार्ट फोन शिकण्याची पुस्तके आधीच तयार असतात . किती सांगू  किती नको .
आज त्यांचा स्पेसिअल वाढदिवस . वर्षे येतात आणि जातात. ते आम्हा सर्व लहानांना कालनिर्णय देऊन वेळेचे महत्व शिकवतात. हीच माया आणि शिकवण आम्हास फार महत्वाची आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे लिहिताना केवढा योगायोग मागे एक बाबूजींचे गाणे चालू आहे.
स्वये श्री राम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती . पुत्र संगीती चरित पित्याचे ....
गदिमा , बाबुजींनीच परमिट दिले आहे वडिलांबद्दल लिहायचे . सॉरी पुलं . ह्या  तिघांचे जन्म शताब्दी वर्ष हा सुद्धा ह्या वर्षीच्या special वाढदिवसाचा योगायोग.

No comments: