Saturday, April 20, 2019

माझ्यातला मराठी पुणेकर


  • ·         जगाच्या इतिहासात महाराज हे सगळ्यात महान आहेत असे मानतो
  • ·         पाऊस आला कि भिजलेल्या  मातीच्या वासाची   आणि ओलसर ढगांमध्ये  सिंहगडावरच्या (अथवा कुठल्याही सह्याद्रीतल्या डोंगरावरील) कांदा  भाजी गरम चहा ची आठवण काढतो
  • ·         चार मित्र गोळा झाले कि अमक्या किंवा तमक्या गडावर ट्रेक चा प्लॅन करतो
  • ·         उन्हाळ्यात हिमालय ट्रेक व  त्याच्या तय्यारी साठी  पर्वतया 'करतो '
  • ·         दोन किंवा तीन वाक्यातून एकतरी  पुलं चा  विनोद टाकतो
  • ·         मृत्युंजय , स्वामी, राजा शिवछत्रपती, छावा , पानिपत , श्रीमानयोगी ची पारायणे करतो
  • ·         मधूनच एखाद्या रविवारी शांतेचे कार्टे , सौजन्याची, वासूची सासू, गेला माधव, वस्त्रहरण नाटकांच्या dvds बघतो

  • ·         बालगंधर्व, प्रभात, बाबूजी, गदिमा, कुसुमाग्रज, भीमसेन, मंगेशकर परिवार,  खळे यां  पासून, लागू, फुले , घाणेकर, लक्ष्या  अशोक, भरत, दामले  सिद्धार्थ, सुबोध, महेश काळे ह्या  सारख्या असंख्य कलाकारांच्या आठवणी काढतो
  • ·         त्याला लहानपणी गणपतीत, शाळा कॉलेज गॅथेरिन्ग , पुरषोत्तम, कामगार कल्याण, राज्यनाट्य मध्ये केलेल्या भूमिकेचे  डायलॉग पाठ असतात व एकदा तरी बालगंधर्व, भारत , यशवंतराव किंवा टिळक च्या स्टेज वर पाय ठेवतो
  • ·         जगात कुठेही ट्रिप ला गेलो तरी त्या महाबळेश्वर कोकण, लोणावळ्या च्या ट्रीपची आठवण काढतो
  • ·         परीक्षेला किंवा महत्वाच्या मीटिंगला दगडूशेठ, विठोबा ,अंबाबाई, खंडोबा, मारुती ,स्वामी समर्थ, साईबाबा, गल्लीतल्या मंदिरातला देव मनात ठेवतो
  • ·         फक्कड जेवणची सुरवात वरण भात तूप व लिंबू पिळून करतो
  • ·         पुण्याहून मुंबई ला जाताना दिवाडकरांचा किंवा दत्त चा वाडा खाऊनच प्रवास पूर्ण करतो
  • ·         भेळ हि फक्त पुण्यातच (सारसबाग, कल्पना, पुष्करिणी किंवा गणेश) कडेच मिळते, इतर ठिकाणी  जो पदार्थ चौपाटीवर किंवा  स्टॅन्ड वर भेळ म्हणून विकतात त्याला भेळ म्हणत नाहीत असे मानतो
  • ·         श्रीकृष्ण ची मिसळ, सुजाता ची मस्तानी, आप्पाची खिचडी, संतोष चे पॅटिस, चितळ्यांचे दूध आणि इतर milk प्रॉडक्ट्स, जयश्री ची पावभाजी a one ची बिर्याणी चव अजूनही पाठ ठेवतो .
  • ·         गोव्याला मासे खाण्या अगोदर तांबडा पांढरा  खायला कोल्हापूरला थांबतो.
  • ·         लग्नात कितीही पंच तारांकित स्टॉल्स, बुफे असले  तरी पंक्तीतला जिलेबी चा आग्रहात जास्त रमतो
  • ·         पिकॅडली किंवा मॅनहॅटन ला असला तरी सारसबाग पेशवेपार्क एरिया त  मजा जास्त केली असे मान्य करतो
  • ·         कॅम्प , कोरेगावपार्क  हि बाहेरगावी असतात असे मानतो.  fc रॊड हा गावात येतो कारण तिथे वैशाली आहे
  • ·         सिग्नल्स पाळणारी  परदेशी माणसे बावळट आहेत असे मानतो
  • ·         एक रुपये देऊन भाड्याने आणलेल्या सायकल शिकल्याचा अनुभवातून जगात बोईंग विमान चालवायचा कॉन्फिडन्स घेतो
  • ·         कुठल्याही उपनगरत घर घेतले तरी महिन्यातून एकदातरी , आणि बाहेरगावी किंवा बाहेरदेशी असल्यास प्रत्येक घरच्या वारीस गेल्यावर  लक्ष्मी रोड, मंडई आणि तुळशीबागेत शॉपिंग करतो
  • ·         आयष्यात असंख्य night out मारल्या तरी गणपती बघण्यात घालवलेल्या   night out सगळ्यात आठवतात
  • ·         घरात गणपती बसवतानाचा  उत्साह आणि विसर्जनाला लागणारी हुरहूर शब्दात व्यक्त करू शकत नाही
  • ·         शास्त्रीय संगीतातले फारसे न कळता आपण सवाई ला कसे नेहमी जातो हे सगळ्यांना सांगतो.
  • ·         तीन ते चार जुनी नवी मराठी गाणी तोंडपाठ करतो कारण ती भेंड्या खेळताना भाव खायला उपयोगी पडतात
  • ·         तेंडुलकर गावस्कर हे स्वर्गातले देव मानतो.
  • ·         दिवाळीत कुठेही असलो तरी नरक चतुर्दशी च्या पहाटे सारसबागे ला मिस करतो
  • ·         ईदचा मसूदभाईंनी पाठवलेला शीरखुर्मा किंवा कॅम्पात क्रिसमस त्याला  तितकाच आवडतो
  • ·         चौथी आणि सातवीत स्कॉलरशिप किंवा दहावी बारावी ची मेरिट लिस्ट  हि हार्वर्ड डिग्री पेक्षा महत्वाची  मानतो
  • ·         असंख्य वाद विवाद , गप्पा, भांडणे  नाटके करण्यातील वाचिक अनुभवामुळे सॉफ्टवेअर मधील करिअर मध्ये इतरांपेक्षा उजवा ठरतो कारण तेथे तेच महत्वाचे असते .
  • ·         कस्टमर म्हणून झालेला अपमानाचा  तो क्लायंट ला मॅनेज करून (गुंडाळून ) बदला  घेतो
  • ·         वसंत व्याख्यानमाला, निवडणुकांतील भाषणे  आणि मॅजेस्टिक गप्पा ऐकल्या च्या अनुभवरून कित्येक सेमिनार्स/कॉन्फेरेंन्सस गाजवतो

वरील सगळे कुणी किती हि वेळा लिहिले वाचले असले तरीही परत आपले विचार म्हणून सोशल मीडिया

वर टाकतो

Though  it might sound cliche , On this Rainy spring morning its but natural to thrive on Nostalgia over a steaming cuppa of chai. I hope many friends would appreciate few final points relevant to common thread professionally.

No comments: