Saturday, April 6, 2019

आनंदयात्रा साजरी करा


गुढीपाडवा म्हणजे वार्षिक परीक्षा , बासुंदी हादडणे , गुढी वरील गाठ्या खाणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कडुनिंबाचे पान चावणे हेच आठवते. थोडी अक्कल आली तेंव्हा कळले कि हे तर भारतीय नववर्ष. थोडे आजून शहाणपण आले तेंव्हा वाटायला लागले कि सगळे जग न्यू इयर तर थर्टी फर्स्ट ला ' सेलेब्रेट ' करते तर आपण का उगाचच वेगळेपण दाखवतो. मग थोडे आयुष्य बघितल्यावर लक्षात आले कि वर्ष म्हणजे काय पृथ्वीची सूर्य भोवती एक फेरी. निसर्गचक्र मग जेव्हा पालवी फुटते तेव्हा नवचैतन्य तेच खरे नवे वर्ष. भारतीय असण्याचा अभिमान वाटला . अस्मिता जाज्वल्य असायला हवी. थोडे जास्तच ना? खूप मजा करा खूप खा, मित्रांना भेटा आणि मोदींना परत आणा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

No comments: