Sunday, January 6, 2019

पुलंना भेटलेला माणूस


 मे महिन्याचे अखेरचे दिवस  होतेहे वाक्य आमच्या घरी एप्रिल पासून जून पर्यंत कधीही ऐकायला मिळू शकते. म्हणजे 'पूर्वीसारखे  पुणे आता राहिले नाही हे वाक्य जसे पुण्यात कुठेही आणि कधीही  ऐकायला मिळू शकते तसे    कारण एक की लहानपणी आम्हाला  आणि मग राष्ट्रभाषेत सांगायचे म्हणजे बीस साल बाद माझ्या कन्येला  मे महिन्याच्या सुट्ट्या लागायच्या . जसे म्हणतात की कोल्हापुर अंबाबाई चे दर्शन घेतल्या शिवाय तिरुपती बालाजी यात्रा पूर्ण होत नाही तसे कोकण महाबळेश्वर ला गेल्याशिवाय आमचे मे महिना पर्यटन पूर्ण होत नाही  . तेंव्हा गाडीत बसल्यावर प्रवासाची सुरवात  ह्या वाक्यानेच होते. पु यांनी म्हैस मध्ये  'अशीच' सुरवात केली आहे. ' आजच्या आपल्या  अध्यक्षांनी त्यांच्या साहित्यात   'असेच' म्हणले आहे' जसे  मिसेस बेचालवर आणि कंपनी त्यांच्या वार्षिकोत्सवाच्या भाषणात म्हणतात 'तसे'.
पु यांना जसा प्रश्न पडतो की ते कोकणात दर वर्षी का जातात तसा  आम्हाला ही प्रश्न पडतो कि आम्ही कोकण महाबळेश्वर ला का जातो. प्रश्न 'पडतो' म्हणजे नानू सरंजामे यांचे नवनाट्य  बघताना मास्टर शंकर म्हणतो तसा नाहीशंकय्रा त्याच्या वडलांना विचारतो की "पडदा कधी पडणार . म्हणजे दांडी वरून धोतर पडते तसे ". आमच्या मते सरंजामे एकच ज्याला झोपायसाठी ट्राम चा आडवा बाक पण पुरतो  आणि जो हिमालयाची उशी करून झोपतो तो . जो आप्ल्या अंग रक्षकाच्या  जीवावर हजारो कोटी चे साम्राज्य हेलिकॉप्टर मधून शेळ्या म्हणजे तीन चार कर्मचारी  हाकून   सांभाळतो तो नव्हे. पडतो म्हणजे अण्णू गोगटे होतो असे सुद्धा नाही. पडतो म्हणजे पुण्यात दुपारी एक ते चार ह्या वेळेत पडतो तसे म्हणजे आंतु बर्व्या  च्या भाषेत सांगायचे   तर अजगर होतो    असे  पण नाही.  प्रश्न पडतो म्हणजे विध्यार्थ्यांना फोडायला गेंड्या च्या कातडीची की  वेताची छडी चांगली असा पडतो तसा . पु लं प्रमाणे आम्हीही  आमचा शब्द पडून दिला नाही . आमचा प्रश्न म्हणजे ह्या सुट्टीत पांचगणी महाबळेश्वर ला जावे कि दापोली ला हा . आमच्या घरात यावरून भांडणे  होतात. भांडण म्हणजे जसे नळावर दोन काकू भांडतात किंवा बेळगाव वरून महाराष्ट्र आणि कर्नाटक भांडतात  तसे. शेवटी सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मध्ये गाडी जेंव्हा कात्रज चा घाट ओलांडून शिवापूर फाट्यावर येते तेंव्हा N H वरून आमच्या स्वप्नां मध्ये अजूनहीम्हैस म्हैस” अशी आरोळी येते ..

पु लं ची ओळख करताना एक पात्र म्हणते “आजचे आपले अध्यक्ष महाराज हे फार विनोदी आहेत . ते तुम्हाला वाक्या वाक्या ला हसवतील तरी श्रोत्यांनी त्यांच्या वाक्या वाक्याला हसून सहानभूती दाखवावी . आमच्या वाक्य वाक्यात पु आहेत” . मिसेस  बेचालवार म्हणतात  “अमेरिके च्या माती च्या कणा  कणात  शेक्सपिअर आहे”. त्याच अमेरिके मातीतून हे लिहिताना  सांगतो कि आमच्या  घरातील प्रत्येक क्षणा क्षणात पु लंनी दिलेली उपमा आहेहे आम्ही आमच्या गळयातील शिरा शिरा ओरडून गर्वाने सांगतो

जेव्हा दसरा येतो तेंव्हा बोरटाके गुरुजी ची 'साधू संत येति घरा तोचि दिवाळी दसरा . तोचि दिवाळी दसरा तोचि दिवाळी.. चूप... दसरा अशी आरोळी यायलाच पाहिजे .
कोणी डिग्रीचे पेढे घेऊन आले कि बगुनाना सारखा "हल्ली काय कॉलेजात कोणीही  जाते " हा आमच्या पुणे ३० (मधली आळी, शिवाजी पार्क आपापल्या प्रमाणे समझावे ) ह्या पत्त्या चे नाव राखून  हिणकस टोमणा मारतो .
घरातील मावशींनी केरसुणी आडवी ठेवली कि आमच्या मनात   हा प्रश्न की   “ हीर नाही मोडत?”.
घरात कुठल्या हि फळाचा वास सुटला की म्हणतो  'त्या फळाची वाचा फुटली  ' जशी खुनाच्या किंवा एसटीत फणसाला वाचा फुटते तशी.
घरी नॉन व्हेज जेवायला केले की 'शेवटी काय बगुनाना सर्व धर्म सारखे  ....आम्लेट "
कोणी सकाळी असंबद्ध बोलले की " काय सकाळी सकाळीच का ?"
फेसबुक किंवा सोशल मीडिया वर कोणी आपण काल  काय खाल्ले किंवा आपण कुठल्या विमानतळावर आहोत हे सांगते तेंव्हा भिकाजीपंतांचे 'कुंभार (झुकेरबर्ग ) हो गाढवास तोटा नाही " हे वाक्य कानावर घुमते.
जास्त कोणी अध्यात्मिक बोलायला लागले तर गुरुदेवाचे "यू  आर  यू  इन इन द यू इन थे आय " आठवते
जेव्हा कॉलेज मध्ये आम्ही जेव्हा गर्दीतील काही सुंदर चेहेऱ्यांना प्रभावित करण्यासाठी निवडक पु साहित्य  वापरायचो  तेव्हा समेवर सुबक ठेंगणी असायची
कॉलेज मध्ये कोणाला  चिडवायला त्याचे किंवा तिचे  नाव घेऊन ' तो अमुक असला  म्हणून काय झाले? त्याला का मन नाही? त्याला का भावना नाहीत? . सामान्य भाषेत सांगायचे म्हणजे तो असेल तर रेडा आणि  ती असेल तर म्हैस. पण पुलकित भाषे चे परिमाण वेगळे आहे.

आम्ही अजून  पण किस्से सांगू पण जसे एखादा पक्का पुणेकर 'बाजरी ला लागलेली कीड' सांगणाऱ्या  व्याख्यात्याला म्हणतो ' त्याकरिता एकदा भेंटू  आपण " तसे आपण भेटू एकदा

हे झाले याला कारण एक संध्यकाळ १९८४ ऑक्टोबर  ची. वेळ साधारण  ची . स्थळ टिळक स्मारक मंदिर पुणे ३० . प्रसंग एका आरोग्य दिवाळी अंकाचे प्रकाशन . माझी आई त्या प्रकाशनाशी संबंधित असल्यामुळे पु यांना स्वागत करणाऱ्या लोक मध्ये दस्तुरखुद्ध आम्ही जाऊ शकलो. ते आले, बॅकस्टेजच्या खोलीत बसले. आणि आमच्या देवाचे पाय धरायला धावलो. आमचा सखाराम गटणे झाला. चेहेऱ्या वर आमच्या एका रिटायर्ड जज चे गांभीर्य आणून आम्ही त्या बालवयात पु यांच्याशी एक दोन जुजबी वाक्ये बोललो. त्यांनी पण आमच्या  बालसुलभ धाडसाचे कौतुक केले. स्वाक्षरी दिली .आशीर्वाद दिलातेंव्हापासून आमच्या डोक्यात पु चढलेचढले म्हणजे जसे  नारायणाच्या अंगात लग्न चढते तसे आणि आम्ही भक्तच झालो...
सॉक्रेटिस ला सूर्य पाहिलेला माणूस म्हणतात तसे आम्हाला  पुलंना भेटलेला माणूस म्हणतात (हे आमचे नाव फक्त आम्हालाच ठाऊक आहे .   कारण की ते आमचीच ठेवले आहे).
पु लंनीच सदू  आणि दादू मध्ये म्हणले आहे की  सॉक्रेटिस मानव आहे , सर्व मानव मर्त्य आहे . म्हणून सर्व मानव सॉक्रेटिस आहेत आहेत . चुकलेच आमचे लॉजिक . पण पु म्हणतात तसे आपण फक्त नावाचे मानकरी . लॉजिक ठरवणार तो वर बसला आहे (१२ जुने २००० पासून) 

With the hype and the buildup created around P. L. Deshpande Marathi Biopic, its my turn to play tribute to Pu La in my own style. Normally I don’t succumb to any commercial buildup like this movie for but when it comes to Pu La everything else just fades away. It must be the same feeling for all his fans all over world.  I am not an authority to judge his greatness as a Writer or an Artist or a Musician or as an Actor, or as a Narrator, or as a Director of Television, or as a Poet, or as a film/drama Director , as a Dramatist, or even as a as a Fan. I had heard a criticism that Pu La glorified middle class experiences and his style was trash. But that’s the same criticism done by elitists to anything that touches chords with popular choice. For me more than all these facets, I love him as a person. He is a perfect role model to search happiness in everything. He makes you believe that life is beautiful and that this spirit has helped me even in the most severe downturns, forget every other normal and happy occasion.  I wish I were a fly on the walls of his drawing room where he enjoyed sessions of musical and literary happiness with his family, friends and near ones. But I have one thing to be proud of that I am someone who has met Pu La…..
( http://Nayakgiri.blogpsot.com  to read more of such post….)


No comments: