Sunday, August 9, 2020

अमेरिकन इतिहासाचे धडे

 


ह्याच जुलै महिन्यात मी अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याची पुण्यातील सदाशिव पेठेची तुलना करणारा लेख लिहिला . तो बऱ्याच जणांना आवडला आणि तो सकाळ मध्ये छापून आला.  

ESAKAL Gautam Naik Post

तो लेख लिहिण्यापूर्वी , कनेक्टिकट राज्याचा इतिहास आणि भूगोल ह्या विषयांवर सगळी माहिती माझ्या कन्ये कडून घेतली. बालादपि सुभाषितं ग्राह्यम हे म्हणतात ना तसे झाले.  हीच माझी कन्या जेंव्हा आठवी पर्यंत महाराष्ट्र बोर्ड च्याइतिहास शिकली  त्यात तिने कधीच रस घेतला नाही अपवाद फक्त  इयत्ता चौथीचा ज्यात महाराजांचा थोडा फार का होईना इतिहास शिकवलं गेला.   इथे तिला अमेरिकेत इतिहास इतका आवडायला लागला. तिला इथल्या ,अमेरिकन इतिहास AP कोर्से मध्ये  पाच म्हणजे पूर्ण पॉईंट्स मिळाले. तिने इथल्या शहरा मधील हिस्टोरिक सोसायटी मध्ये शहरच्या इतिहासाचा प्रोजेक्ट केला. खूप अवांतर वाचन केले. ह्याला कारण म्हणजे ज्या पद्धती ने त्यांना इतिहास शिकवतात ती  फार आपल्यापेक्षा फार वेगळी पद्धत आहे. आपल्याला जर इतिहास घडवणारे तरुण तयार करायचे असतील तर त्यांना इतिहास चांगला माहित असला पाहिजे. काही लोकांच्या मते इतिहास जितका कमी शिकवला किंबहुना नाही शिकवला तर भारत तंटामुक्त होईल. मला काही असे वाटत नाही. माझा ह्या लेखामागचा उद्देश हा अमेरिकन शिक्षण पद्धतीतले चांगले गुण जाणून घेणे हाच आहे. इथे अमेरिकेत पण मोठे वाद आहेत. विशेषतः काही संवेदनशील विषय जाणीवपूर्वक वगळण्याचा. त्या तपशिलात पण मला फारसे शिरायचे नाही.

शाळेत असताना मी एच जी वेल्स चे टाइम मशीन हे पुस्तक वाचले होते.  ‘बॅक टू फ्युचर’  हा चित्रपट पण बघितला होता . अर्थात तो एक गावाच्या स्थानिक आणि त्यातील राहणाऱ्या पात्रांच्या इतिहासाबद्दल होता. मेकिंग हिस्टरी हि सिरीज अमेरिकी क्रांतीवर आधारित होती. काही केट अँड लिओपोल्ड किंवा नाईट ऑफ ख्रिसमस हे टाइम मशीन आधारित रोमँटिक कॉमेडी  चित्रपट पण पहिले. इतिहास शिकण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग  म्हणजे टाइम मशीन मध्ये बसून त्या काळात जाणे. शाळेत असताना वाटायचे एक सॅक घ्यावी त्यात एक टाइम मशीन टाकून थेट राजगड माथा गाठावा आणि त्या मशीन च्या कंटोल पॅनल वर १६५० साल टाकून त्या वर्षात जावे  आणि त्या राजाचे दर्शन घ्यावे. अर्वाचीन भारतीय इतिहासातला सगळ्यात सुवर्ण युग अनुभवावे . त्या नंतर कंट्रोल पॅनल मध्ये १८५७ पासून १९४७ महत्वाची वर्षे टाकावीत आणि लाल,बाल, पाल , लाला लजपत राय , भगतसिंग , आझाद बोस , पटेल, सावरकर यांच्यासारख्या अगणिक स्वातंत्र्यवीरांच्या त्याग अनुभवावे . एकत्रितपणे त्या काळाचा आढावा घ्यावा. इसवीसन पूर्व १००० ते इसवीसन १००० हा जो भारतभूमीचा सुवर्ण काळ होता त्याचा अभ्यास करावा . त्या काळात भारताचा जी डी पी  जगाच्या जी डी पीत  सर्वात जास्त होता. शिक्षण , सामाजिक व्यवस्था या बाबती आघाडी वर होता.  परकीय आक्रमणे, अशास्त्रीय  रूढी आणि अंतर्गत सामाजिक असमतोलामुळे तो काळ उध्वस्थ झाला. असो टाइम मशीन जो पर्यंत बनेल तो पर्यंत दुसरा पर्यायी उत्तम मार्ग म्हणजे प्रगत देश त्यांचा इतिहास कसा शिकवतात ते बघू.

अमेरिकेत विद्यार्थ्यांना पाचवी किंवा सहावीत इतिहास पहिल्यांदा शिकवलं जातो . अमेरिकन इतिहास , जगाचा इतिहास आणि भूगोल हे विषय असतात.  विद्यार्थ्यांना  त्यांच्या  योग्यतेनुसार आणि आवडीनुसार प्रोजेक्ट्स पण  असतात . हाईस्कूल ( नववी ते बारावी) दोन प्रकारचे असतात सरकारी किंवा खाजगी . अभ्यासक्रम त्याप्रमाणे वेगळा असू शकतो. इतिहासाची आणि सर्वच विषयांची माहिती असलेले नागरिक तयार करणे हा त्यांचा उद्देश दोन्ही ठिकाणी दिसून येतो. ग्रॅजुएशन करण्याकरता कमीतकमी तीन वर्षे त्यांना सोशल स्टुडीएस (इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र )चे क्रेडिट घ्यायला लागतात . ग्रॅजुएट होण्या करीत अमेरिकी हिस्टरी आणि अमेरिकी नागरिक शास्त्र हे विषय  अनिवार्य असतात. ऐच्छिक विषयांचे एकमेकांवर आधारित एक प्रणाली तयार असते.  वेस्टर्न सिव्हिलिझशन (पश्चिमी सभ्यता ), अमेरिकन हिस्टरी (अमेरिकेचा इतिहास ) १ आणि २, अडवान्सड प्लेसमेंट्स (ए पी म्हणजे कॉलेज लेवल) युरोपिअन इतिहास, ए पी अमेरिकन इतिहास , ए पी  गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ( सरकार आणि राजकारण) ,  नागरिक शास्त्र,  कायदा आणि व्यवस्था,  अडवान्सड  अमेरिकन स्टडीएस (अभ्यास) हे सर्व व्यस्थित आणि खोलात जाऊन शिकवले जाते.

पश्चिमी सभ्यतेच्या अभ्यासाची सुरवात ग्रीक आणि रोमन साम्राज्यापासून सुरु होते . मग त्यानंतर  मध्ययुग  त्यांनतर नवरोज्जीवन काळ, नव्या जगाचा शोध  ( उ आणि द अमेरिका ),  त्यानंतर औद्योगिक क्रांती . अमेरिकी इतिहासाची सुरवात पॅनजिया , बरिंजिया स्ट्रेट जी अमेरिकेला यूरेशिया शी जोडते, त्यातून येणारी मानवता , इंडियन जमाती ,  युरोपिअन वसाहती, अमेरिकी क्रांती, अमेरिकी संविधान, अमेरिकी यादवी,  आर्थिक मंदी ,  महायुद्धे,  समान नागरी कायदा चळवळ , शीतयुद्ध , ९/११,  नवीन आर्थिक मंदी  २०१६ पर्यंत. शिकण्याच्या पद्धतीत प्रोजेक्ट , मुलांनी वेगवेगळ्या ऐतिहासिक पात्रांच्या भूमिका घेणे , सॉक्रेटिस सेमिनार (वादविवाद), परीक्षा, असाइन्मेंट  हे सगळे असते. आपल्याकडं फक्त पाठांतरावर जोर असतो . आपला पाल्य  हे सगळे करतोय याचा पालकांना अभिमान वाटतो.

सुदैवाने माझ्या मुलीला शिकवायला मिसेस ओ (त्यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म )  होत्या.  विद्यार्थ्यां मध्ये  इतिहासाचा निःपक्षपाती मजबूत पाया तयार व्हावा ह्यासाठी त्यांनी  वेगळे प्रयत्न केले . त्या म्हणतात

"कॉलेज स्तरावरच्या माझ्या स्वतःच्या अनुभवांचा हा एक नैसर्गिक अविष्कार आहे. जाणकार नागरिकांनी त्यांना गंभीर नजरेने सादर केलेल्या माहितीचे मूल्यांकन करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. हे एक महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे आणि म्हणूनच मी त्यास महत्त्व देते.   “इतिहासकार म्हणतात तेच असं इतिहास आहे.” ही धारणा चुकीचे आहे असं त्यांना प्रथमच सांगितलं गेलं . मी माझ्या सर्व यूएस इतिहासाच्या विद्यार्थ्यांना  वाचन करण्यासाठी बनविलेले 2 लेख समाविष्ट केले आहेत.

Strange Case of Silas Deane

Is History True

आम्ही सॉक्रॅटिक सेमिनार (वादविवाद) मध्ये या बद्दल  चर्चा करतो. खास करून  u  s  हिस्टरी  कोर्से मध्ये चिकित्सक विचारसरणी आणि युक्तिवाद ह्या कौशल्यांचा सातत्याने वापर होईल ह्याची काळजी घेतो .  "श्रीमती ओ म्हणाल्या

अभ्यासक्रम नियमितपणे अद्ययावत केला जावा ही सरकारची अपेक्षा असते  अभ्यासक्रम दर काही वर्षांनी सुधारित केले जातात. तथापि, नियमितपणे अभ्यासक्रम कसे दिले जावे यावर शिक्षक थोडे बदल करतात. शासकीय विभाग   प्रशासकीय निरीक्षणासह पुनरावृत्ती प्रक्रियेस मार्गदर्शन करतात. मान्यताप्राप्त संस्थांनी त्यांच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी, संपूर्ण शाळेत अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन केले जाते आणि पदवीधरांच्या शाळेच्या दृष्टीकोनात असलेल्या सामान्य टेम्पलेटवर आधारित  केले जाते.

इथल्या सत्ताधारी सरकारांचा  अभ्यासक्रमावर प्रभाव असतो  . उदाहरणार्थ, सर्व उच्च माध्यमिक शाळांमध्ये   2022 पासून सुरु होणारा  आफ्रिकन अमेरिकन / लॅटिनो इतिहासावर अभ्यासक्रम सरकार विकसित करीत आहे इतिहासाचे स्वतंत्रपणे विश्लेषण करण्यास सुसज्ज  झालेले विद्यार्थी बघून आश्चर्य वाटते.  त्या तुलनेतआपले विद्यार्थी इतिहासातील  निरस शिक्षण फक्त्त स्मरणशक्तीचा उपयोग करून परीक्षे मध्ये उत्तीर्ण होतात,

सर्व शिक्षक, मंडळे, सरकारी संस्था इत्यादी यांनी सर्व प्रयत्न करूनही काही लोक अमेरिकेच्या शिक्षणाबद्दल खूपच टीका करतात.  काही विषय  जाणीवपूर्ण गाळलेले  आहेत असे म्हणतात. विशेषतः आफ्रिकी अमेरिकी इतिहास,, इंडियन जमातीतील इतिहास वगैरे. विषयार्थ्यांना लुईसिना पपरचेस , मार्बरी विरुद्ध मॅडिसन , काही लोकांनी अमेरिकी क्रांतीला विरोध का केला इत्यादी विषय माहीतच नसतात .

आपल्याकडे इसवीसन पूर्व १००० पासून इसवीसन १००० पर्यंत इतिहासात अंधार आहे.  त्यामागची राजकीय करणे राहू द्यात पण आपल्याला इतिहासाची जाणीव आणि त्याचा अभ्यास करणारी  युवा पिढी पाहिजे. इतिहास जाणणारेच इतिहास घडवतात . पु लंचे चे हरितात्या कसे मुलांना  रंजक इतिहास शिकवतात तसे शिकवता आले पाहिजे . अमेरिके च्या सर्व गोष्टींची नक्कल करतो तश्या त्यांच्या चांगल्या गोष्टी इथे राबवू . बघू काही फरक पडतोय का?

No comments: