ह्याच
जुलै महिन्यात मी अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याची पुण्यातील सदाशिव पेठेची तुलना करणारा
लेख लिहिला . तो बऱ्याच जणांना आवडला आणि तो सकाळ मध्ये छापून आला.
तो लेख लिहिण्यापूर्वी , कनेक्टिकट राज्याचा इतिहास आणि भूगोल ह्या विषयांवर सगळी माहिती माझ्या कन्ये कडून घेतली. बालादपि सुभाषितं ग्राह्यम हे म्हणतात ना तसे झाले. हीच माझी कन्या जेंव्हा आठवी पर्यंत महाराष्ट्र बोर्ड च्याइतिहास शिकली त्यात तिने कधीच रस घेतला नाही अपवाद फक्त इयत्ता चौथीचा ज्यात महाराजांचा थोडा फार का होईना इतिहास शिकवलं गेला. इथे तिला अमेरिकेत इतिहास इतका आवडायला लागला. तिला इथल्या ,अमेरिकन इतिहास AP कोर्से मध्ये पाच म्हणजे पूर्ण पॉईंट्स मिळाले. तिने इथल्या शहरा मधील हिस्टोरिक सोसायटी मध्ये शहरच्या इतिहासाचा प्रोजेक्ट केला. खूप अवांतर वाचन केले. ह्याला कारण म्हणजे ज्या पद्धती ने त्यांना इतिहास शिकवतात ती फार आपल्यापेक्षा फार वेगळी पद्धत आहे. आपल्याला जर इतिहास घडवणारे तरुण तयार करायचे असतील तर त्यांना इतिहास चांगला माहित असला पाहिजे. काही लोकांच्या मते इतिहास जितका कमी शिकवला किंबहुना नाही शिकवला तर भारत तंटामुक्त होईल. मला काही असे वाटत नाही. माझा ह्या लेखामागचा उद्देश हा अमेरिकन शिक्षण पद्धतीतले चांगले गुण जाणून घेणे हाच आहे. इथे अमेरिकेत पण मोठे वाद आहेत. विशेषतः काही संवेदनशील विषय जाणीवपूर्वक वगळण्याचा. त्या तपशिलात पण मला फारसे शिरायचे नाही.


