Thursday, November 25, 2021

चंदेरी ते बनवाबनवी

 



आयुष्य म्हणजे काय?  वर्तमानात जगून भविष्यासाठी  नवीन आठवणी तयार करणे . आयुष्यात अशी संधी मिळाली की  तिचे सोने करणे आपल्या हातात असते .  अशी संधी  आम्हा  कनेक्टिकटची ५० -५५ हौशी कलाकारांना आणि २५० प्रेक्षकांना  मिळाली . इथे अमेरिकेत सातासमुद्रापार आपण सगळे भारतीय  सण  जोरदार  साजरे करतो. त्यात जरका आपल्या मराठी संस्कृतीचा सुगंध लाभला तर ह्या सगळ्या सोहोळ्याला वेगळाच रंग चढतो.

अमेरिकेतील सदाशिव पेठ म्हणता येईल अश्या आमच्या कनेटिकट  राज्यात मराठी मंडळाने ह्या दिवाळीला लख लख चंदेरी ते अशी हि बनवाबनवी असा चित्रमय प्रवास साजरा केला आणि त्याबरोबरच पु , बाबूजी आणि गदिमा यांना आदरांजली वाहिली. नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम CTMM दिवाळी धमाका मध्ये २० नोव्हेंबर ला न्यूविंगटन  कनेक्टिकट  येथे वल्लभधाम मंदिरात रंगला. गणपती मधील हास्ययात्रेच्या  उत्तम प्रतिसादानंतर काय हा  प्रश्न  निर्माण झाला. गेल्या काही वर्षांपासून आमचा इथला एक संगीत ग्रुप चांगला जमला आहे . आम्ही सर्व कराओके वीर व्हाट्सएप्प ग्रुप वर गाणी पोस्ट करतो. एक  रसगंधर्व नावाचा अल्बम पण युट्युब  वर टाकला आम्ही . आम्ही  कधी कधी प्रत्यक्ष जमतो आणि गाणी गातो . ह्या  मैफिलींमध्ये मध्ये गाण्याला थीम देण्याच्या आणि निवेदन देण्याचा  प्रकार मी दोन तीन वेळा केला . तेंव्हा ट्रेव्हिया देऊन आणि एका धाग्याला बांधून  ठेवणारे असे  निवेदन करत असे. त्यावेळा एक मोठा अल्फा TV  वरील नक्षत्रांचे देणे असा कार्यक्रम करावा असे बेच वेळा वाटत असे. . हा प्रस्ताव आमच्या EC  समोर ठेवला आणि सहमती झाली .  मग सुरु झाला  ह्या लख  लख  चंदेरी CTMM दिवाळी धमाका चा प्रवास.

नक्षत्रांचे देणे  हा कार्यक्रम असेल तर  पु , बाबूजी आणि गदिमा ही  त्रिमूर्ती तर आठवणीत दत्त म्हणून उभी ठाकते . आणि नुकतीच ह्यांची जन्म शताब्दी साजरी झाली .  ह्यांच्या व्यतिरिक्त  आपल्या चित्रपट श्रुष्टीच्या तीन  संस्था ज्यांना म्हणता येईल अश्या प्रभात, भालजी यांचा जयप्रभा स्टुडिओ (दादा आणि मंगेशकर सुद्धा) आणि लक्ष्या , अशोक , सचिन आणि महेश अशी चौकडी  अश्या वेगवेगळ्या काळातल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या संस्था यांना आदरांजली वाहू असे ठरवले.

नृत्य , गाणी आणि नाटक अश्या तीन माध्यमातून आम्ही आमचा कार्यक्रम सादर करणार होतो. म्हणून गाणी निवडणे , नाच असेलेले परफॉर्मन्स निवडणे आणि नाट्यातून  प्रस्तुत केलेले चित्रपट किंवा साहित्य असे तीन प्रकार  निवडायचे होते. आमच्या प्रोग्रॅम ला वादक उपलब्ध नव्हते म्हणून गाण्यांना कराओके ट्रॅक चा उपयोग करायचा असे ठरले .

कार्यक्रमाची सुरवात बाबूजी , पु   आणि गदिमा यांच्या संयुक्त पणे केलेल्या कलाकृतीतून व्हावी आणि त्यात कलाकृतीत वंदेमातरम असावं हा योग जुळवला.  वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदेमातरम हे गाणे ठरले.  ते गाणे  लहानग्या व्योम कडेगावकर  ला येते असे त्याच्या बाबूजींचे फॅन असलेल्या काडेगावकर दाम्पत्यांनी सांगितले . आणि छोट्या व्योम नी  पहिल्याच बॉल वर षटकार ठोकला.

प्रभात म्हणले तर गाणी आलीच  . लहान मुलांकडून सगळ्यात जुनी गाणी गेली गेली तर आपसूक एक व्वा फॅक्टर तयार होतो. प्रभात च्या गाण्यातली दोन लहान मुलावर चित्रित झालेली गाणी म्हणजे दोन घडी चा डाव आणि मन शुद्ध तुझं . ही  गाणी  फार लोकप्रिय आहेत आणि मुलांना  गायला योग्य आहेत.   अर्णव मालपुरे ने दोन घडीचा डाव आणि त्यातल्या शेवटच्या ताना फार सुंदर रित्या घेतल्या. आयुष आणि आरुषी साबडे ह्या भाव बहिणींनी मन शुद्ध तुझे घेतले.  योगायोगाने मेरा गानावर दोन घडीचा डाव चा  कराओके ट्रॅक होता पण साबडे कुटुंबीयांनी तो त्यांचा भारतातील वादक सभासदांकडून तयार करून घेतला.

प्रभात चे सगळ्यात लँडमार्क गाणे म्हणजे लख लख चंदेरी. त्यागाण्यावरचा नाच दिवाळीला अतिशय समर्पक होणार होता .  साऊथ  विंड्सर चा कल्याणी पंडित यांचा चंदेरी डान्स ग्रुप ने हे शिवधनुष्य हाती घेतले.  त्यांनी  चित्रपट श्रुष्टीचे अभिमान गीत असलेले नवीन व्हर्जनवर डान्स बसवला. १५ हुन अधिक महिला आणि १० हुन अधिक मुलांनी ह्यात भाग घेतला. प्रेक्षकांना फार आवडला. त्यांनी २० एक दिवस जोरदार तयारी केली होती, एवढ्या लोकांनी जमणे आणि सराव करणे हा मोठा उपक्रम होता.

पु लंच्या अफाट कामांपैकी काय आणि कसे नाट्यमयरित्या साजरे करायचे हा प्रश्न वैदेही परांजपे ह्यांच्या व्यक्ती अँड वल्लीस ह्या ग्रुप नि सोडवला.  पु लंचे  मी आणि माझा शत्रुपक्ष मधील नवीन  घर दाखवणारा गृहस्त आणि फोटो दाखवणारे दाम्पत्य आणि स्वतः पु त्यांनी  सुंदर रित्या रंगवले. सर्व विनोद आणि त्याचे बारकावे टिपले.

मागच्या वर्षी दिवाळी ऑनलाईन एक पात्री कार्यक्रमात जोत्स्ना कुरकुटे हिने ती फुलराणी मध्ये तुला शिकवीन चांगलाच धडा सादर केला होता. त्यावेळी पु लआजच्या सोशल  मीडिया च्या काळात असते तर त्यांनी हाच प्रवेश कसा लिहिला असता ह्याचा विचार करून मी ती स्क्रिप्ट लिहिली होती.  ती BMM उत्तररंग च्या कार्यक्रमाला सादर करावी असा प्लॅन होता पण काही कारणांनी तेंव्हा जमले नव्हते. पण ते आता प्रत्यक्ष स्टेज वर सादर करायचे असे ठरले. जोत्स्ना हे प्रचंड एनर्जी  ने सादर करतात आणि एवढा मोठा मोनोलॉग पहिला विसरून दूसरा पाठ करायचा हे अवघड होते. ते त्यांनी अफाटरित्या  सादर केले.

बाबुजी आणि गदिमा यांचे गीत रामायण हा मराठी साहित्य  आणि संगीत ह्यांचा आत्मा आहेत. त्यात जरका नृत्य सादर केले तर तो तिय्या पूर्ण होईल आहि कल्पना बऱ्याच वेळा सादर झाली आहे. ती आपण पण करावी असे ठरले. त्याले सगळ्यात योग्य असे स्वयंवर झाले सीतेचे हे गाणे नृत्य स्वरूपात वैदेही परांजपे आणि त्यांचा यंग स्टोरी टेलर्स  ग्रुप यांनी सुंदर रित्या  सादर केले.

सुधीर फडके यांचे एक धागा सुखाचा हे गाणे बाबुजीचा फॅन असलेला हेमंत काडेगावकर याने सादर केले . आशा ताई आणि बाबूजींची अनेक युगुल गीते लोकप्रिय आहेत त्यातील चंद्र आहे साक्षीला हे गाणे मी स्वतः आणि लीना दामले ह्यांनी सादर केले.

मग आम्ही चित्रपट श्रुष्टि कडे वळलो . भालजींचे योगदान फार मोठे आहे.  भालजींची गाणी मला खूप सुंदर वाटतात . याला कारण म्हणजे मंगेशकरांचा संगीत.  भालजींच्या फिल्म इन्स्टिट्यूशन मधून दादा कोंडकेंसारखे कलाकार तयार झाले.  अखेरचा हा तुला दंडवत मधील  दारी दरीतील  देवाचे दर्शन करून आलेल्या  मावळ मनाला हे गाणे फार हृदयस्पर्शी वाटते. ते गाणे अंजली साबडे ह्यांनी सुरेख रित्या साजरे केले. नवीन लोकांकरिता एक रीमिक्स पण घ्यावे असे ठरवले . ते म्हंजे अवधूत गुपचे बाई बाई मनमोराचा . ते गाणे मुकुंद आवटी  सारख्या ग्रुप मध्ये  लोकप्रिय कलाकाराला द्यावे असे ठरवले.  दादांवर चित्रित दोन गाणी घ्यावी असे ठरवले. एक युगल गीत जे टिपिकल दादा असे म्हणता येईल म्हंजे माळ्याच्या मळ्यामधे . ते अंजली आणि मुकुंद यांनी मजेशीर रित्या गेटअप मध्ये सादर केले.  मिनार मुजुमदार यांनी 'डोल मोराचा मानेचा हे सुरेख रित्या सादर केले. 

गदिमा यांचे भाषाप्रभुत्व म्हणून माहेर हि कविता काव्यवाचनातून निवेदिका असलेल्या शिल्पा कुलकर्णी आणि वेदवती  कडेगावकर सादर केली. वॉटर सायकल  ह्या विषयावर भाववविश्व  व्यापून टाकणारी कविता फार अफलातून आहे.  हान्स  अँडरसन च्या अग्ली  डकलिंग ह्यावर दि मां  नी  एका तळ्यात होती हे गाणे लिहिले आहे. ते मधुरा राव ह्यांनी गायले . बाबूजींनी अजरामर लावण्या लिहिल्या. डान्स ला योग्य अश्या बुगडी माझी आणि उसाला लागेल कोल्हा ह्या लावण्या  वैभवी पंडित ह्यांच्या लावणी लावण्यवतीस ह्या ग्रुप ने धमाकेदार लावण्या नृत्यातून सादर केल्या .

 सगळ्यात शेवटी अशोक लक्ष्या महेश आणि सचिन ह्या चौकडी ह्यांचे काम नाटकातून दाखवायचे ही किमया  अमेय टुमणे ह्यांच्या नटरंगस ग्रुप ह्यांनी केले . ह्या नाटकात मी स्वतः काम पण केले. आम्ही  अशी हि बनवाबनवी ह्या सगळ्यात  गाजलेल्या सिनेमाचे २०-२५ मिनिटात सगळे आयकॉनिक सीन्स असलेली नाटुकली केली. सुधीर जोशी ह्यांची  भूमिका  रंगमंचावर करायचे माझे स्वप्न पूर्ण झाले. अमेय  टुमणे ह्यांचा  लक्ष्या आणि केदार कुलकर्णी ह्यांचा सचिन आणि स्त्रीवेषात त्यांनी केलेली धमाल प्रेक्षकांच्या खूप लक्ष्यात राहिली.  मुकुंद आवटी  ह्याचा अशोक आणि जोत्स्ना कुरकुटे हिची अश्विनी भावे उत्तम झाली .  अभिजात आणि वीणा  वग्गा  यांनी सिद्धार्थ आणि निवेदिता ह्यांच्या भूमिका चोख पार पाडल्या . वर्ष देशमुख ह्यांनी सुप्रिया आणि  अश्विनी जोशी यांनी भावना यांचे काम केले. वर्षां यांनी हृदयी वसंत,   कुणीतरी येणार हा डोहाळजेवणाचा धम्माल डान्स आणि बनवाबनवी चे थीम सॉन्ग  या सगळ्यावर कोरिओग्राफी उत्तम रित्या बसवली . अमेय ह्यांचे स्क्रिप्ट लेखन आणि दिग्दर्शन खुमासदार होते. नाटकांच्या तालमीत सगळ्यांनी खूप धम्माल केली .

ह्या सगळ्याची शेवट ने मजसी ला  बाबूजी आणि हृदयनाथ ह्यांनी दिलेल्या  चालींचा संगम करून व्हावी असे वाटले. पहिल्या अंतऱ्यातले कारुण्य आणि शेवटच्या अंतऱ्यातले शौर्य हे उठणं दिसले असते असे वाटले. हे अवघड काम लीना दामले यांनी केले. त्यांना सर्व कलाकारांनी साथ दिली आणि ह्या नक्षत्राचे देणे कार्यक्रमाची  हृदयस्पर्शी सांगता केली

ध्वनी यतीन राव यांनी, दृश्य चित्रे प्रफुल कुलकर्णी यांनी सांभाळले. नियोजनात हेमंत काडेगावकर यांनी मदत केली.  निवेदन मी स्वतः, शिल्पा कुलकर्णी आणि वेदवती कडेगावकर यांनी केले. व्यवस्थापनात CTMM  EC  चे राधिका परमानंद, किरण परांजपे , वैभवी पंडित, माधवी कानेटकर आणि वृषाली सालोडकर सोबत होतेच

ह्या कार्यक्रमात किल्ले आणि रांगोळी स्पर्धांचा  बक्षीस समारंभ आणि  लहान मुलांनी केलेली मल्लखांब प्रात्यक्षिके पण साजरी झाली.  मराठमोळे जेवण आणि मराठी दांडिया यांचा आनंद पण उपस्थित मराठी लोकांनी घेतला.

२५० च्या आसपास संख्येने  ने असलेल्या उपथित प्रेक्षकांनी आणि ५० हुन अधिक कलाकारांनी प्रस्तुतीकरणात खूप आनंद साजरा केला. ही  दिवाळी सगळ्यांना खूप स्मरणात राहील.

 

 

1 comment:

Amey Tumne said...

गौतम, महाराष्ट्राची अस्मिता मनामनात जागृत ठेवण्यात तुमचे व CTMM च्या सर्व teams चे योगदान वाखाणण्याजोगे आहे !!!
तुम्ही फक्त ‘लढ’ म्हणा, आम्ही सदैव तयार आहोत !!!