ही घटना ४ जुलै १७७६ (American Independence) ची नसून ह्या २०
फेब्रुवारी २०२१ ची आहे आणि तीही आपल्या कनेक्टिकट
मधील मराठी माणसांनी घडवून आणली . शिवजयंती
च्या निमित्ताने आयोजलेल्या नाट्यमाध्यमातून.
करोना मुळे थोडे नैराश्याचे आणि आर्थिक मंदीचे वातावरण होते गेले वर्षभर . काळरात्र जरी नसली तरी अंधाराची छाया आणि अनिश्चितता दाटून आली होती . मग उभारी घेऊन गरुडझेप घेण्यासाठी आपण काय करावे ? आपल्या इतिहासात अशक्य गोष्टी करण्याची प्रेरणा तीन अक्षरात दडून बसली आहे. नुसते शिवाजी महाराज म्हणले की मनगटा मध्ये जोर येतो आणि कुठल्याही संकटाशी सामना करायचे बळ येते. इथे तर कनेक्टिकट मधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट ) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM ) चमूने अक्खे शिवचरित्र नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले तेही ३५ मिनिटात. शिवजन्मापासून स्वराज्य स्थापनेच्या राज्याभिषेक सोहोळ्या पर्यंत सर्व घटनांचा समावेश असलेला बहुमाध्यमिक म्हणजे नाच, पोवाडे, नाट्य , देशी खेळ समाविष्ट असलेले फिरोदिया करंडकाच्या स्वरूपात केलेला कलाविष्कार प्रत्यक्ष उपस्थित प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. करोना काळातली सगळी बंधने आणि काळजी घेऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम न्यू जर्सी मध्ये मल्लखांब फेडेरेशन USA आणि इंडियन कॉन्सुलेट नी शिवजयंती निमित्त आयोजित केला होता .
ह्या शिवसोहळ्याची सुरवात साधारण २० जानेवारी च्या आसपास झाली. इतक्या छोट्या वेळात आणि सद्य परिस्थिती च्या मर्यादां मध्ये उभी राहिलेली ही कलाकृती हे एक आश्चर्य म्हणण्या सारखे आहे. केवळ ३ पूर्ण तालमी आणि दर दिवशी केलेले झूम आणि व्हाटस अँप कॉल्स ह्याने हे नाटक उभे राहिले म्हणतात ना शिवाजी ही तीन अक्षरे सामान्य माणसाला अद्वितीय गोष्टी करण्याचे सामर्थ्य देतात. उत्कृष्ट 'टीमवर्क' म्हणजे सांघिक कामगिरी ज्याला म्हणता येईल ह्याचे एक उदाहरण . मल्लखांब संघटनेशी संलग्न असलेले श्री उपेंद्र वाटवे ह्यांनी ह्या प्रस्तावित कार्यक्रमाची कल्पना २० जानेवारी च्या सुमारास दिली. संकल्पना आणि संहिता लिहिण्याचे काम मी आणि प्राजक्ता दीक्षित यांनी सुरु केले. संयोजनामध्ये दुर्गेश जोशी , किरण परांजपे आणि मुकुंद आवटी यांनी मुख्य हातभार लावला. पार्श्वसंगीत आणि पोवाड्याचा भार अनुप्रिया कायंदे आणि प्रसाद दीक्षित यांनी सांभाळला. नृत्य दिग्दर्शन मोहना जोग आणि सीमा वाटवे यांनी केले. देशी खेळ आणि लेझीम याचे आयोजन वैदेही परांजपे यांनी केले. रंगभूषा, कला, वेशभूषा ह्या महत्वाच्या बाबी ज्याने ह्या नाटकाला दृश्य परिणामकता दिली , त्या बाबी कीर्ती मोरे, उपेंद्र आणि सीमा वाटवे , दीपाली आवटी यांनी समर्थ पणे सांभाळल्या . वल्लभधाम मंदिराचे चे राजीव देसाई यांनी तालमीसाठी जागा उपलब्ध करून दिली.
फिरोदिया स्वरूप ही मूळ संकल्पना होती त्यामुळे संहितेत नाटक भाग हा जिजाऊंनी शिवबांना कसे घडवले ह्यावर आधारित मी केला. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मी आणि प्राजक्ता दीक्षित यांनी सांभाळली सद्य परिस्थिती तुलना एक शाहीर ( मुकुंद आवटी )आणि सामान्य माणूस (प्रसाद दीक्षित) करतात आणि शिवचरित्रातून स्फूर्ती घेतात. शिवजन्मानन्तरचा पाळणा नृत्य स्वरूपात प्रस्तुत झाला. सर्व स्त्री कलाकारांनी यात उत्साहानी सहभाग घेतला. जिजाऊंची भूमिका प्राजक्ता दीक्षित यांनी सुंदर रित्या पार पाडली. ज्या पुण्यात गाढ वाचा नांगर फिरवला अश्या शून्यातून, स्वराज्य निर्माण करण्या ची प्रेरणा जिजाऊंनी कशी दिली. सोन्याचा नांगर (यात किरण परांजपे यांनी पंतांची भूमिका केली), स्वराज्याची संकल्पना , जिजाऊ महाराजांच्या आयुष्याची माहिती , रांझेकर पाटलाचा निवाडा , सवंगड्याची साथ, देशी खेळ आणि लेझीम आणि रायरेश्वरसमोरची शप्थ हे सगळे प्रवेश सुंदर रंगले. बाल चमू चा लक्षणीय सहभाग होता. स्वरा कायंदे यांनी बालशिवाजीची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली. तन्वी आणि तेजस परांजपे, मैथिली आवटी , रुशील आणि रिशान जोग, श्रीहरी कायंदे,आणि आद्या दीक्षित ह्या बाल चमू ने मजा आणली. मावळे झालेले उपेंद्र वाटवे आणि दुर्गेश जोशी यांना बॅक स्टेज साठी संतोष कायंदे आणि योगेंद्र जोग यांनी मदत केली. अफझल वध आणि पावनखिंडी ची लढाई हे प्रवेश पोवाड्याच्या स्वरूपात प्रस्तुत झाले . ढोलकी वर प्रसाद दीक्षित , पेटीवर अनुप्रिया कायंदे, मुकुंद आवटी यांनी धरलेली टाळ आणि त्यांना सुरात स्वतः अनुप्रिया कायंदे , सीमा वाटवे , अश्विनी आणि दुर्गेश जोशी यांनी दिलेली साथ ह्यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. नंतर शाहिस्तेखानाला दिलेली शिकस्त ,आग्र्याहून सुटका निवेदनातून सांगितले गेल्यावर शिवराज्याभिषेकाचा सोहोळा ढोल ताशाच्या गजरात आणि नृत्यातून प्रस्तुत झाला आणि स्वराज्याची स्थापनेचा जयघोष न्यू जर्सी मध्ये दुमदुमला . प्रेक्षकानी धरलेला ठेका आणि जयजयकाराने वातावरण पूर्ण भारावून गेले.
तिथे
जमलेल्या प्रेक्षकांना ह्या प्रयोगांनी शिवकाळात
नेऊन ठेवले. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असेलेले भारताचे कॉऊंसेल जनरल श्री रणधीर जैस्वाल
यांनी ह्या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले. मल्लखांब
फेडेरेशन ऑफ USA कडून चिन्मय पाटणकर आणि कुटुंबीय,
राहुल जोशी , महेश वाणी आणि नीरज नरगुंड यांनी
शिव जयंती निमित्त आयोजित केलेल्या सुरेख कार्यक्रमाला कार्यक्रमाला राज्याचे मंत्री
आणि खूप सन्माननीयांनी स्वतः किंवा ऑनलाईन उपस्थिती लावली . ह्या कार्यक्रमात न्यू
जर्सी येथील मल्लखांब संघानी डोळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली अमेरिकेतील
वादळ आणि स्नो स्टॉर्मला ना जुमानता कनेक्टिकट हुन २-३ तास प्रवास करून ह्या मावळ्यांनी न्यू जर्सी
चा गड जिंकला आणि उपस्थित आणि लाईव्ह वेबकास्टिंगद्वारा बघणाऱ्या प्रेक्षकांची मने सुद्धा
संपूर्ण नाटक पाहण्यासाठी क्लीक करा
No comments:
Post a Comment