Friday, June 5, 2020

कठीण समय येता विनोद कामास येतो.




कठीण समय येता
विनोद कामास येतो.

इथे मी  विनोद कांबळी किंवा खन्ना किंवा इतर कुठल्या ही विनोद नाव असलेल्या माणसाबद्दल बोलत नाही . लोक मुलाचे नाव विनोद का ठेवतात ? पु ल म्हणतात नवस करून  नऊ महिने जीवापाड जपून दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडील विनोद कसे काय ठेवतात हे आजवर नाही समजले

माझा संदर्भ विनोद म्हणजे हास्य किंवा हसणे हसवणे हा आहे  .

आपण आनंदी राहण्यासाठी काय नाही करत. सकाळी सहा वाजता उठून आपल्याला आवडत किंवा आवडत नसलेल्या कामासाठी जातो. काही लोक स्वतः ला (लोक)ल अक्षर लावून लोकल सारख्या कोंडवाड्यातून प्रवास करतात. असल्या लोकांना आपण मुंबईकर म्हणतो . राब  राब  राबतो. कशासाठी पोटासाठी पु ल म्हणतात तसे आणि नंतर खंडाळ्याच्या घाटापलीकडल्या स्वर्गात (पुण्यात) निवृत्त  होण्या साठी. कदाचित ह्या  नवीन सहस्रकात ही आयुष्याची सार्थकता नसेल कदाचित पण खूप पैसे मिळवायचा.   कशाकरिता? खूप खायला, फिरायला मजा करायला थोडक्यात आनंदी राहायला.हसून आपण आनंदी राहतो . हसवून आपण आनंद पसरवतो  मग हसा  हसवा, आणि आनंदी राहा ना.

हसण्याचे महत्व आपण दुःखात जास्त ओळखतो

परवाच कोणाच्यातरी बोलण्यात पुराव्याने शाबीत असे आले. तुम्हाला वाटेल की  मी  आता हरितात्या सुरु करतो की काय . पण जर पुराव्यानेच विनोदाचे महत्व  शाबीत  करायचे  असेल तर करोनाच्या दुःखात सगळ्यात काय जोरात असतात ते करोना चे जोक्स , व्हाट्सअँप फॉर्वर्डस, टिकटॉक चे विनोदी व्हिडिओ (चीन चा निषेध). एकमेकांना पाठवून आपण दिलासा देण्याचा आणि उभारी देण्याचा प्रयत्न करतो.




दुसऱ्या महायुद्धात जर्मनी ला देखील कैदी  पी जी वुडहाऊस चे रेडिओ प्रसारण करणे महत्वाचे वाटले.

चि वी जोशींची चिमणराव आणि गुंड्याभाऊ ह्या कथामालिकेतील एका कथेत चिमणरावांचे कुटुंब प्लेगमुळे एका खेडेगावात क्वारंटाईन होते. मी ती गोष्ट वाचली आहे . खरेतर प्लेग खूप जीवघेणा होता पण आपला विनोदी नायक धीरोदात्त पणे  त्यातून विनोद निर्माण करत होता आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत होता.  पात्र जरी काल्पनिक असले तरी संकटात मनुष्य हसून आणि हसवून आपले दुःख कमी करतो.

हरितात्यांनी दिलेल्या इतिहासातील उभारणीमुळे संकट समयी पु लंच्या मनगटांना वळ्या पडतात. अपूर्वाई मध्ये लंडन ला जाताना इजिप्त इस्राएल युद्धा मुळे  त्यांच्या पॅकिंग वर  कसा प्रभाव पडला के वाचून आपण खूप हसतो. वेगवेगळ्या वॅक्सीन घेताना पु लं ची तारांबळ वाचून आपण हसतो . असामी असामी मध्ये जेंव्हा ती समोरच्या कोनाड्यात असलेली हिंदमाता स्वतंत्र होते आणि बेन्सन जॉन्सन कंपनी इंडिया लिमिटेड होते आणि सगळे कारकून ज्याला जगबुडी म्हणतात त्याप्रमाणे होते आणि फेदरवेट हसतो हे सगळे बघतात आणि हे असे आपण आयुष्यात पहिल्यांदा बघतोय हे प्रत्येकाने प्रत्येकला सांगितले. कोरोना मुळे जे घडते आहे ते आपण पहिल्यांदा बघतोय हे जसे आपण प्रत्येक व्हॉट्सअँप ग्रुप वर वाचतो तसे.

सायकॉलॉजिस्ट म्हणतात कि संकट काळी हसणे हे  तीन प्रकारे होते.
१. ऍरिस्टोटल नी म्हणलं आहे जसे मुले अभ्यास करून कंटाळली की खेळतात . मोठी माणसे शब्दांचे किंवा विचारांचे खेळ करून विनोद निर्मिती किंवा विरंगुळा तयार करतात
२ फ्रॉइड म्हणतो कि हास्य हे रिलिफ आहे म्हणजे हसून आपण प्रेशर किंवा टेन्शन घालवतो
३. विरोधाभासाने  (incongruence) निर्माण होणारा विनोद   . दोन भिन्न गोष्टीतून होणार विरोधाभास आजूबाजूला दिसणाऱ्या वास्तवावर वेगळ्या बाजूनी बघण्याचा तठस्थ दृष्टिकोन निर्माण करतो  .

ते काही का असेना ह्या संकट काळात आपण खूप विनोदी झालो आहोत.  संकट काळ सोडा ,   PJ किंवा जोक्स मारणे हा माझा बारा महिने आवडता छंद आहे. तसे मराठी माणसाला मुळात काय आवडत असेल तर विनोद.  बाकी कुठली ही गोष्ट सोशल मीडिया वर शेअर करू नका पण एखादा जोक, कार्टून टाका आणि आपल्या मित्रांच्या धकाधकीच्या दिवसात एक स्मितहास्य का होईना पण निर्माण करायचा प्रयत्न करा.  सोशल मीडिया मुळातच एक जोक आहे. सोशल मीडियाला आपण इतके सिरिअस ली घेतो कि आपली सोशल प्रतिमा आपलीच वैरी होते. ते सोडा . पण जून पर्यंतच्या २०२०च्या अवघड दिवसात (अजून काय काय बघायचे बाकी आहे ह्या वर्षात) सगळ्यात मदत करतात ते विनोद . त्यासाठीच म्हणतो हसा आणि हसवा.

पूर्वी मराठी मनात विनोदाचे स्थान एवढे मोठे नव्हते. इथे तर संत सांगून गेले होते . टवाळा आवडे विनोद . पूर्वी एक दोन संगीत नाटके होती ज्यात थोडा विनोद होता पण विनोदाला मुख्य प्रवाहात आणण्या चे श्रेय चि  वि जोशी , पु ल आणि अत्रे यांना. गडकऱ्यांनी टोपण नाव वापरून थोडा फार विनोद केला इतकाच. मग राजा गोसावी, मधू आपटे , गणपत पाटील यांनी किल्ला लढवला सिनेमात.  त्यानंतर अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर , लक्ष्मीकांत बेर्डे , प्रशांत दामले, संजय नार्वेकर, भारत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि आता अगदी भाऊ कदम पर्यंत सगळ्यांना स्टारडम मिळाले .काही नवे विसरल्यास क्षमस्व

स्त्री वर्गा  ला कॉमेडी म्हणाल तर मधुबाला, श्रीदेवी, जुही , माधुरी  यांना खूप टाईमिंग सेन्स होता. मधल्या   काळात  काजोल, करीना आणि आत्ता बहुतेक  , मराठी मध्ये निर्मिती सावंत ह्या आठवतात .  पूर्वी टुणटुण , शुभ खोटे यांच्या वाट्याला थोडा विनोद यायचा पण मेनस्ट्रॅम विनोदी भूमिका नसायच्या .

सध्या महाभारत जोरात आहे. पण आम्हा विनोदपंथीयांना आवडतात  ते मालवणी वस्रहरणातळे तात्या म्हणजे मछिंद्र कांबळी . अर्रर्रर्र जुना उचल ते धनुष्य आणि लाव त्या बाणाला . किंवा आठवतो तो जाने भी दो यारो मधला प्रसंग. हम  भी शेर होल्डर है ... 

सध्या नेटफ्लिक्स च्या  दिवसात सुद्धा विनोदपंथी पारायणे करतात विनोदी चित्रपटाची नाटकांची . अंदाज अपना अपना , पडोसन , चुपके चुपके , अशी हि बनवाबनवी, धुमधडाका, मोरू ची मावशी, वऱ्हाड , वासू ची सासू, हसवाफसवी,  केवढी मोठी लिस्ट. टीव्ही सीरिअल्स मध्य  ये जो है जिंदगी, देख भाई देख, साराभाई आणि थोड्या प्रमाणात तारक मेहता आठवतात 

एक मात्र आहे कि विनॊदात आपण एथिक्स किंवा तारतम्य बाळगले पाहिजे हे सांगणे महत्वाचे. नाहीतर विनोद त्याचे सौन्दर्य सोडून विर्द्रुप होतो 

स्वानुभवातून तुम्हाला सांगतो आयुष्यातील सगळ्यात अवघड दिवसात पु लंचे कथाकथन, शांतेचे कार्टे , वुडहाऊस चे jeeves यांचे   महत्व अनन्यसाधारण होते .

इंग्लिश पिक्चर चे हिरो कितीही संकटं आली तरी जोक्स मारणे सोडत नाहीत .
आपण तसेच इंग्लिश पिक्चरच्या हिरो सारखे राहू
शांतेचे  कार्टे मध्ये शाम्या अप्पांना ' बकवास बंद ' सांगतो  तसे

एक मात्र आहे कि विनोदी माणसाला कोणी फारसे सिरिअसली घेत नाही . बरे आहे म्हणा ते. काय फरक पडतो
'बकवास बंद'
खरे तर विनोदी लेखक आणि सिरिअस लेखक त्याच तर गोष्टी सांगतात पण वूड हाऊस आणि शेक्सपिअर मध्ये फरक काय?
वुड हाऊस  म्हणतो

“I suppose the fundamental distinction between Shakespeare and myself is one of treatment. We get our effects differently. Take the familiar farcical situation of someone who suddenly discovers that something unpleasant is standing behind them. Here is how Shakespeare handles it in "The Winter's Tale," Act 3, Scene 3:

ANTIGONUS: Farewell! A lullaby too rough. I never saw the heavens so dim by day. A savage clamour! Well may I get aboard! This is the chase: I am gone for ever.

And then comes literature's most famous stage direction, "Exit pursued by a bear." All well and good, but here's the way I would handle it:

BERTIE: Touch of indigestion, Jeeves?
JEEVES: No, Sir.
BERTIE: Then why is your tummy rumbling?
JEEVES: Pardon me, Sir, the noise to which you allude does not emanate from my interior but from that of that animal that has just joined us.
BERTIE: Animal? What animal?
JEEVES: A bear, Sir. If you will turn your head, you will observe that a bear is standing in your immediate rear inspecting you in a somewhat menacing manner.
BERTIE (as narrator): I pivoted the loaf. The honest fellow was perfectly correct. It was a bear. And not a small bear, either. One of the large economy size. Its eye was bleak and it gnashed a tooth or two, and I could see at a g. that it was going to be difficult for me to find a formula. "Advise me, Jeeves," I yipped. "What do I do for the best?"
JEEVES: I fancy it might be judicious if you were to make an exit, Sir.
BERTIE (narrator): No sooner s. than d. I streaked for the horizon, closely followed across country by the dumb chum. And that, boys and girls, is how your grandfather clipped six seconds off Roger Bannister's mile.

Who can say which method is superior?"

तुम्हीच ठरवा  कोणते चांगले

मराठीत एक पु ल देशपांडे विरुद्ध जी ए कुलकर्णी वाद जुना आहे

PL Vs GA

जेंव्हा तुम्ही दुःखाच्या छायेतून बाहेर पडून  हसायचा प्रयत्न करता  तेंव्हा कदाचित जॉर्ज बर्नार्ड शॉ चे शब्द आठवतील 

Life does not cease to be funny when someone dies,
any more than it ceases to be serious when someone laughs.


तुम्ही रावसाहेबां प्रमाणे सात मजली  शेवटचे कधी हसलात ?

No comments: