अमेरिकेच्या
मातीच्या कणा कणात शेक्सपिअर आहे आपले आजचे प्रमुख पाहुणे जेंव्हा
भारताच्या मातीच्या कणा कणात जातील तोच खरा सुदिन. पु ल हे
ऐकून दचकतात. आपली ओळख करून देताना जर कोणी असे
म्हणत असेल तर काय करावे
त्यांनी ? इथे उभ्या महाराष्ट्रात ते
बघताना प्रेक्षाकांमध्ये हशा. तसाच हशा आपण त्याच अमेरिके च्या मातीत पिकवू शकू का? अमेरिकेचे सदाशिव पेठ ज्याला म्हणता येईल अश्या न्यू इंग्लंड
भागातील कनेक्टिकट राज्यात वाऱ्या वरची वरात बसवताना अनेक प्रश्न . बाकी काही म्हणा पु लंच्या साहित्यात
सदाशिव पेठेला वेगळेच स्थान आहे म्हणून न्यू इंग्लंड
ला सदाशिव पेठ म्हणालो. इथले अमेरिकन लोक वेगळे आणि बाकीचे इतर असे समजतात हाही एक योगायोग
मराठी
मंडळाच्या प्रतिनिधींनी व्हॉट्स ऍप्प च्या माध्यमातून दिलेल्या आव्हानाला होय
म्हणालो खरे
पण ते आपण पेलू
शकु का ही शंका होती.
अमेरिकेत मराठी मंडळे नेहमींच नाटके करतात. महाराष्ट्रातून अनेक रंगकर्मी इथे येऊन प्रयोग करतात. मग त्यात नवीन काय किंवा त्याबद्दल तुम्हाला का सांगावे ? आणि असेही नाही कि आम्ही
आमचे उभे आयुष्य रंगभूमीच्या उद्धाराकरिता व्यतीत गेले. भारतातील नाटकात थोडासा अनुभव, थोड्याशा आठवणी एवढ्याच तुटपुंजी वर
आम्ही अमेरिकन नाट्यश्रुष्टीत काही क्रांती घडवून आणणार नव्हतो . मग आमच्या अमेरिकी
स्टेज च्या पदार्पणाची गोष्ट का सांगावी?
कारण
स्वतः पुलं नी सांगितले आहे असामीअसामी मध्ये. दिगंबर काका म्हणतो: “ इथे ज्ञानेश्वर माऊलींनीच परमिट दिले
आहे. कि राजहंसाचे चालणे असेल जगी शहाणे म्हणून
कावळ्याने चालूच नये काय?”
Dr
लागू , काशिनाथ घाणेकर असतील मोठे रंगकर्मी म्हणून ह्या पुणेकर गौतमा ने अनुभव सांगू नये की काय?
तर
करू मी सुरवात?